पुणे

नारायणगावात कोथिंबीर, मेथी वधारली

सकाळवृत्तसेवा

नारायणगाव - जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील उपबाजारात कोथिंबीर व मेथीच्या बाजारभावात वाढ झाली. कोथिंबीर, मेथी व शेपूच्या दोन लाख सत्तावीस हजार जुड्यांची आवक झाली. चांगल्या प्रतीच्या कोथिंबिरीला शेकडा पाचशे ते अडीच हजार रुपयांच्या दरम्यान, तर मेथीच्या जुड्यांना शेकडा तीनशे ते एक हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.

मागील तीन महिन्यांपासून कोथिंबीर, मेथीच्या बाजारभावात मोठी घट झाली होती. घटलेल्या बाजारभावामुळे कोथिंबीर, मेथीच्या जुड्या टाकून देण्याची वेळ उत्पादकांवर आली होती. काढणी मजुरी वसूल होत नसल्याने बहुतेक उत्पादकांनी कोथिंबीर व मेथीच्या शेतात जनावरे सोडली होती. 

मागील दोन दिवसांपासून येथील उपबाजारात आवक घटल्याने कोथिंबीर व मेथीच्या भावात वाढ झाली आहे. उपबाजारात लोणी, धामणी, अवसरी (ता. आंबेगाव), संविदणे या भागांतील शेतकऱ्यांची कोथिंबीर व मेथीच्या जुड्यांची आवक जास्त होत आहे. पाऊस नसल्याने चांगल्या प्रतीचे उत्पादन घेणे या भागातील शेतकऱ्यांना शक्‍य झाल्याने वाढीव भावाचा लाभ झाला, अशी माहिती व्यापारी कमलाकर वाजगे यांनी दिली.

टोमॅटोच्या भावात घसरण
नारायणगाव येथील उपबाजारात टोमॅटोच्या तीस हजार क्रेटची मंगळवारी (ता. ११) आवक झाली. चांगल्या प्रतीच्या टोमॅटो क्रेटला (वीस किलोग्रॅम) पन्नास रुपये ते एकशे वीस रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. घसरलेल्या बाजारभावामुळे टोमॅटो उत्पादक चिंतेत आहेत.

कांदा व डाळिंबाचे भाव स्थिर
आळेफाटा (ता. जुन्नर) येथील उपबाजारात डाळिंबाच्या २ हजार ८१५ क्रेटची तर कांद्याच्या १० हजार ८०४ गोणींची आवक झाली. प्रतवारी नुसार डाळिंबाला प्रति किलोग्रॅम दहा ते पंचाहत्तर रुपयांच्या दरम्यान, तर कांद्याला दोन रुपये ते अकरा रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले...

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

SCROLL FOR NEXT