ty.jpg 
पुणे

भिगवण स्टेशन येथील कोरोनाबाधीत रुग्णांच्या संपर्कातील ते संशयित...

प्रा. प्रशांत चवरे, भिगवण.

भिगवण : इंदापुर तालुक्यातील भिगवण स्टेशन येथील कोरोना बाधीत महिलेच्या संपर्कातील १४ व्यक्तींच्या घशातील द्रव्य कोरोना तपासणीसाठी इंदापुर व बारामती येथे घेण्यात आले असल्याची माहिती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैदयकिय अधिकारी डॉ. रोहन कुंभार यांनी दिली आहे. हे अहवाल मंगळवारपर्यंत येण्याची शक्यता आहे. या अहवालावर भिगवण येथील कोरोनाची वाटचाल ठरणार असल्यामुळे अहवालाकडे भिगवणसह परिसराचे लक्ष लागले आहे.

भिगवण स्टेशन(ता.इंदापुर) येथील ४० वर्षीय महिला शुक्रवारी(ता.१०) कोरोनाबाधीत झाली होती तर शनिवारी(ता.११) सदर महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणुन महिलेच्या संपर्कातील १४ व्यक्तींना इंदापुर व बारामती येथील विलगीकरण कक्षात ठेवले होते. 
रविवारी (ता.१ २) संपर्कातील १२ व्यक्तींच्या घशातील द्रव्य इंदापुर येथे तर २ व्यक्तींच्या घशातील द्रव्य बारामती येथे तपासणीसाठी घेण्यात आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

याबाबतचा अहवाल मंगळवारपर्यंत येण्याची शक्यता प्रशासनाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. या अहवालांवर भिगवण व परिसरातील कोरोनाची वाटचाल ठरणार 
असल्यामुळे या अहवालांकडे भिगवण व परिसरातील लोकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान भिगवण स्टेशन येथील महिला कोरोनाबाधीत झाल्यामुळे भिगवण स्टेशन हे कंटेन्मेंट झोन म्हणुन तर इंदापुर तालुक्यातील भिगवण, तक्रारवाडी, मदनवाडी, डिकसळ आदी गावे ही बफर झोन घोषित करण्यात आली आहेत. कंटेन्मेंट व बफऱ झोनमध्ये सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली. तीन किलोमीटर परिसरातील नागरिकांना कोरोना किंवा इतर आजाराची लक्षणे आहेत का याची चौकशी करण्यात येत आहे.

याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ. रोहन कुंभार म्हणाले, भिगवण स्टेशन येथे कोरोना रुग्न आढळुन आल्यामुळे भिगवण स्टेशन कंटेन्मेंट झोन तर परिसरातील तीन किलोमीटरचा परिसर बफर झोन जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

भारताला 'त्या' मोठ्या निर्णायानं बनवलं T20 World Cup चॅम्पियन, रिकी पाँटिंग स्पष्ट बोलला; सूर्याचंही केलंय कौतुक

Dharashiv : बोलेरोची वॅगनारला मागून धडक, त्यानंतर डिवायडर तोडून होंडा सिटीवर आदळली; तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर

Harish Rana Last Video: 'सगळ्यांची माफी मागून जा...'; हरीश राणाच्या इच्छा मृत्यूपूर्वीचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल, कुटुंबाला अश्रु अनावर

Latest Marathi Live Update : संध्याकाळी बीसीसीआयच्या पुरस्कार सोहळ्यात विश्वविजेत्या भारतीय संघाचा होणार गौरव

SCROLL FOR NEXT