पुणे

दौंड : तीन दिवसांत पंधरा जणांवर अंत्यसंस्कार

प्रफुल्ल भंडारी

दौंड : दौंड शहरातील स्मशानभूमीत मागील तीन दिवसात पंधरा कोरोना बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. पंधरा पैकी चौदा मृतदेह दौंड शहराबाहेरचे होते परंतु मृतदेह शहरातून नेण्यात आल्याने दौंडकरांच्या जीवाला काही काळ घोर लागला होता.

दौंड शहर व परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. शहरातील उप जिल्हा रूग्णालय, दौंड नगरपालिका व लिंगाळी (ता. दौंड) हद्दीतील रूग्णालयांमध्ये दौंड तालुक्यासह शेजारील शिरूर आणि श्रीगोंदा (जि.नगर) येथील ग्रामस्थ उपचारार्थ दाखल होतात. मागील आठवड्यापासून कोरोना बाधितांची संख्या वाढल्यानंतर पंधरा बाधितांचा मृत्यू झाला आहे. सदर मृतदेह शहरातील प्रमुख चौकांमधून महात्मा गांधी चौक मार्गे भीमा नदीकाठावरील स्मशानभूमीत रूग्णवाहिकेतून नेण्यात आल्याने दौंडकरांच्या जीवाला घोर लागला होता. स्मशानभूमीत बिडाच्या पाच शवदाहिन्या आहेत. नगरपालिकेने अंत्यसंस्कारासाठी दत्तात्रेय तुपसौंदर्य व मुकेश तुपसौंदर्य यांची नियुक्ती केली असून ते पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (पीपीई) किट परिधान करून अंत्यसंस्कार करतात.

सध्या मध्यरात्री व पहाटे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणले जात आहेत. पंधरा मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर काही नातेवाईक सावडण्याचा विधी करण्यास वेळेत न आल्याने जागेअभावी तीन मृतदेहांचे जमिनीवर सरण रचून अंत्यसंस्कार करण्यात आले. 

असला कसला आग्रह-रूग्णवाहिकेतून कोरोना बाधितांचा मृतदेह बाहेर काढण्यापासून सरणावर ठेवण्याचे काम करावे लागते. नातेवाईक तेव्हा हातसुध्दा लावत नाहीत. नातेवाईकांनी सांगितले तरच आम्ही अग्नि डाग देतो. मात्र अशा परिस्थितीत देखील काहीजण आम्हाला शिकाळी धरण्याचा आग्रह धरत असल्याने आम्ही त्यास नकार देतो, अशी माहिती मुकेश व दत्तात्रेय तुपसौंदर्य यांनी दिली.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Russia-Ukraine War: मानवी तस्करी प्रकरणी सीबीआयची मोठी कारवाई, रशियन नागरिकासह चौघांना अटक

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT