corona
corona  
पुणे

बाप रे, लग्नात मिरवलेला युवक निघाला कोरोनाबाधित

नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे (पुणे) : शिरूर तालुक्यातील 
रांजणगाव गणपती येथे अखेर तीन महिन्यानंतर एका २९ वर्षाच्या युवकाला कोरोनाची बाधा झाली असून, त्याचा रिपोर्ट आज सकाळी पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी महेश सातव यांनी दिली. 


या युवकाला  चार दिवसांपूर्वी त्रास होऊ लागल्याने त्याने येथील एका खासगी दवाखान्यात उपचार घेतले, परंतु जास्तच त्रास होऊ लागल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी काल बुधवारी तो आला. त्याची तपासणी केल्यानंतर त्याला वाघोली येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे डॉ. सातव यांनी सांगितले. 


संबधित युवक पुणे (विमाननगर) येथे १९ जून रोजी जेवणासाठी गेला होता. तेथेच त्याला संसर्ग झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, त्याने रांजणगाव परिसरात लग्नात मिरवला होता. त्यामुळे आणखी किती जणांना त्याचा संपर्क आला आहे, याची माहिती आरोग्य विभाग घेत आहे. संबंधित युवकाच्या संपर्कातील ३५ लोकांना आरोग्य विभागाने क्वारंटाइन केले असून, शिरूर येथे शुक्रवारी त्यांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी नेण्यात येणार आहेत. 

दरम्यान, अष्टविनायक महागणपतीच्या रांजणगावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून प्रशासनाने गेली तीन महिने विविध उपाय योजले. त्यामुळे अद्याप तरी हे गाव कोरोनामुक्त होते. परंतु, अखेर रांजणगावात कोरोनाचा शिरकाव झाला. या युवकाच्या संपर्कातील आणखी किती जणांना ससर्ग होणार, याची भीती ग्रामस्थांना वाटू लागली आहे. 

कोरोनाला रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने खबरदारीचे उपाय योजले असल्याचे सरपंच सर्जेराव खेडकर, उपसरपंच अजय गलांडे व ग्रामविकास अधिकारी किसन बिबे यांनी सांगितले. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोनाला रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT