पुणे

आंबेगाव तालुक्यात आढळला कोरोनाचा रुग्ण

सकाळवृत्तसेवा

महाळुंगे पडवळ : आंबेगाव तालुक्यात साकोरे येथे मुंबईहून पती-पत्नी शुक्रवारी (ता.१५) आले होते. याची चाहूल प्रशासन व ग्रामपंचायतीला लागल्यानंतर त्यांनी शनिवारी (ता.१६) वैद्यकीय तपासणीसाठी पिंपरी-चिंचवड येथे पाठविले. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रशासनाने सतर्कता दाखविल्यामुळे गावातील अन्य व्यक्तींबरोबर होणारा त्यांचा संपर्क टळला आहे. खरबदारीचा उपाय म्हणून परिसर सील करण्यात आले आहे.

गेली दीड महिना प्रशासन कोरोनाचा शिरकाव आंबेगाव तालुक्यात होऊ नये म्हणून प्रयत्नांची पराकष्ठा करत आहे. पण मुंबईहून आलेल्या व्यक्तींमुळे तालुक्यात कोरोणाचा शिरकाव झाला असून, पहिला रुग्ण साकोरे येथे सापडला आहे. यामध्ये प्रशासनाचा काहीएक दोष नाही, असा दावा ग्रामपंचायतीने केला आहे. कुटुंबीयांनी स्वतःला साकोरे गावाबाहेर असलेल्या घरात होम क्वारंटाईन केले होते. शनिवारी (ता.१६) दाम्पत्याला पिंपरी-चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर पतीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अन्य नागरिकांना खबरदारीचा उपाय क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून गावात उपाययोजना सुरु केल्या आहेत. रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणाच्या परिसरातील एक किलोमीटर अंतरात पूर्ण सील केले जाणार आहे. संपूर्ण गावात सर्व्हेक्षण राबवून लक्षणे आढळून आल्यास नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणातून 3983 क्युसेक विसर्ग; कृष्णा नदीची पातळी वाढणार, आज सायंकाळपर्यंत पाणी पोहोचणार सांगलीत

Gangs Of Wasseypur: वासेपूर पुन्हा गोळीबाराने हादरले; फहीम खानच्या भावावर दिवसाढवळ्या हल्ला, गँगवॉर पुन्हा भडकणार?

Xiaomi 18 Pro Series होणार लाँच! 8500mAh बॅटरी, ड्युअल 200MP Leica कॅमेरा; पाहा नव्या फ्लॅगशिपचे भन्नाट फीचर्स!

Marathi News Live Updates : गंगाखेड तालुक्यात गांजाची लागवड, ७६.९६ लाखांचा माल जप्त

Mumbai Water Metro: मुंबई वॉटर मेट्रोसाठी समुद्रतळाचा मोठा अडथळा; खडकाळ भागात ‘रॉक ड्रेजिंग’, २५० किमी जलमार्गांचा विकास

SCROLL FOR NEXT