पुणे

बारामतीकरांनो, आता काळजी घ्यायलाच हवी कारण...

मिलिंद संगई

बारामती : कोरोनाने आता बारामतीत अक्षरशः हैदोस घालण्यास प्रारंभ केला आहे. काल प्रतिक्षेत असलेल्या 234 नमुन्यांपैकी बारामतीतील 64 जण पॉझिटीव्ह आढळले. दरम्यान काल तपासलेल्या नमुन्यांपैकी तब्बल 149 जण पॉझिटीव्ह आहेत. कालच्या एकाच दिवसातील आकडा हा 213 झाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पुणे जिल्ह्यात बारामतीत सर्वाधिक चाचण्या होत असून त्या मुळे रुग्णांची संख्याही बारामतीतच अधिक असल्याचे चित्र आहे. बारामतीत एल एकाच दिवसात 687 रुग्णांचे नमुने तपासले गेले. इतक्या मोठ्या संख्येने एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी तपासण्या होत नाहीत, बारामतीत तपासण्यांची संख्या अधिक असल्याने रुग्ण संख्याही वेगाने वाढत आहे. बारामतीतील तपासणी संख्येचा टप्पा आता सहाशे ओलांडून गेला आहे. तपासणी करणारी यंत्रणा चोवीस तास कार्यरत आहे.

प्रशासकीय स्तरावर उपाययोजना सुरु असल्या तरी कुटुंबातील प्रत्येकानेच आता स्वताःची काळजी घेण्याची गरज वैद्यकीय व्यावसायिकांनी बोलून दाखवली आहे. उन्हाळा सुरु झाल्यानंतर रुग्णसंख्या कमी होईल, अशी अपेक्षा होती प्रत्यक्षात रुग्ण संख्येचा आकडा आज दोनशेचा टप्पा ओलांडून पुढे गेला आहे. अनेक रुग्णालय हाऊसफुल्ल असून पुढील काही दिवसात व्हेंटीलेटर्सची कमतरता भासू शकते अशी स्थिती आहे.

गृहविलगीकरणाची परवानगी द्यावी...
ज्या रुग्णांना कसलीही लक्षणे नाहीत मात्र ज्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, ज्यांच्याकडे स्वतंत्र राहण्याची व्यवस्था आहे, अशा रुग्णांना गृहविलगीकरणात राहण्याची परवानगी द्यायला हवी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. जेणेकरुन यंत्रणेवरचा ताण या मुळे कमी होऊ शकतो. या बाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय करण्याची गरज आहे. 

अहवाल येईपर्यंत विलगीकरणात राहण्याची गरज..
जे संशयित आपला स्वॅब तपासणीसाठी देतात, त्यांनी स्वँब दिल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत कुठेही फिरु नये, अहवाल येईपर्यंत स्वत:ला इतरांपासून दूर ठेवावे, विलगीकरणातच राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. स्वँब दिल्यानंतर अनेक जण आपापली कामे करत गावभर हिंडतात, त्यांच्या संपर्कात अनेक जण येतात आणि ही संख्या वाढू लागली आहे. स्वँब देणा-या प्रत्येकाने ही बाब कटाक्षाने पाळली तर कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ शकते. 

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; दिला सतर्कतेचा इशारा

Nagpur Vidhan Bhavan Project: नागपूर विधानभवनाचे रूपडे पालटणार; १,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दोन्ही सभागृह येणार एकाच छताखाली

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

Maharashtra Rain: पालघरमध्ये मुसळधार! 24 तासांत 134 मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प

Navi Mumbai: बटाटावड्यात आढळली अळी, नवी मुंबई महापालिकेच्या भोजनालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT