corona1
corona1 
पुणे

ससूनला जातो सांगून कोविड सेंटरमधून पळाला कोरोना संशयित   

दत्ता म्हसकर

जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री येथील कोविड केअर सेंटरमधून आपल्या मूळ गावी निघून गेलेला कोरोना संशयित रुग्ण पुन्हा सेंटरमध्ये दाखल झाला असून, त्यास पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले.

जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयातून संबंधित संशयित रुग्ण तपासणीसाठी लेण्याद्री येथे दाखल झाला होता. येथे त्याची प्राथमिक तपासणी करण्यात आली असता त्याला श्वास घेण्यात त्रास होत असल्याचे आढळून आले होते. मात्र, लेण्याद्री येथील केंद्रात ऑक्सिजनची सुविधा नसल्याने त्यास पुणे येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. पुणे येथे जाण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली आणि ससून रुग्णालयात त्याचेसाठी बेडची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी त्याने आपण खासगी वाहनाने जाणार असल्याचे सांगितले. 

लेण्याद्री येथील कोविड सेंटरमधून तो पुणे येथे जाण्यास निघाला, मात्र पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल झाला नसल्याचे चौकशीत समजताच आरोग्य विभागाने त्याची शोध मोहीम हाती घेतली होती. रात्री उशिरा तो आपल्या मूळ गावी एका बाजूला असलेल्या घरात असल्याचे आढळून आले. पुणे येथे न जाता थेट मूळगावी निघून आल्याचे त्याने सांगितले. त्यास पुन्हा सकाळी दाखल करून ससून येथे पाठविण्यात आले असून, त्याच्या कोरोना तपासणीचा अहवाल अद्याप आला नसल्याचे सांगण्यात आले. रुग्ण मिळून आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, या प्रकरणी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

Edited by : Nilesh Shende 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT