Vaccination Sakal
पुणे

किशोरवयीनांच्या लसीकरणात पुणे काठावर पास

अठरापेक्षा जास्त वर्षे वयोगटातील लसीकरणात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असणारा पुणे जिल्हा १५ ते १७ वर्षे या वयोगटात मात्र काठावर पास झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

अठरापेक्षा जास्त वर्षे वयोगटातील लसीकरणात राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असणारा पुणे जिल्हा १५ ते १७ वर्षे या वयोगटात मात्र काठावर पास झाला आहे.

पुणे - अठरापेक्षा जास्त वर्षे वयोगटातील लसीकरणात (Vaccination) राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असणारा पुणे जिल्हा (Pune District) १५ ते १७ वर्षे या वयोगटात मात्र काठावर पास झाला आहे. या वयोगटात जेमतेम ३६.९८ टक्के लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

राज्यात ६० लाख ६३ हजार किशोरवयीन मुला-मुलींच्या लसीकरणाचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यापैकी ३७ लाख ४६ हजार ८८० मुलांनी (६२ टक्के) लशीचा पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा लशीचा डोस घेणाऱ्या मुलांची संख्या २३ लाख ८४ हजार ४५ (३८ टक्के) आहे. यात दोन्ही डोस घेणाऱ्यांमध्ये भंडारा जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. तर, पुणे जिल्हा चौदाव्या क्रमांकावर असल्याचे खात्यातर्फे सांगण्यात आले.

भंडारा जिल्ह्यात १५ ते १७ वर्षे वयोगटातील ५९ हजार ५६८ मुला-मुलींना लस देण्याचे लक्ष्य आहे. त्यापैकी ३९ हजार २२६ मुलांनी लस घेतली. त्या तुलनेत पुण्यात पाच लाख ५३ हजार १९० मुलांपर्यंत लशीचा डोस पोचविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी दोन लाख ४५ हजार ९२ (३६.९८ टक्के) मुलांना पुणे जिल्ह्यात लशीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे टक्केवारीच्या निकषांमध्ये पुणे जिल्हा मागे पडल्याचे दिसते, असे आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

Milk Rate : पुणे जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांना १ रुपयाचा दूधदर फरक; वार्षिक उलाढाल ३८७ कोटीवर

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

SCROLL FOR NEXT