corona virus lockdown ncp givern kirana material to people at shirur taluka
corona virus lockdown ncp givern kirana material to people at shirur taluka 
पुणे

गरजूंना राष्ट्रवादीतर्फे किराणा वाटप...

नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे (पुणे): आंबेगाव-शिरूर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिरूर तालुक्यातील ३९ गावांतील सुमारे ३००० गरीब व गरजू नागरीकांना जिवनाश्यक वस्तुंचे (किराणा माल) वाटप सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी दिली.  

माजी केंद्रीय कृषीमंञी शरद पवार याच्या आवाहनाला प्रतिसाद देत  कामगार मंञी दिलीप वळसे पाटील व  खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गरजूंना एक हात मदतीचा या उपक्रमा अंतर्गत आंबेगाव शिरूर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे  ३९ गावांतील गरजू नागरीकांना तांदुळ, आटा, साखर, तुरडाळ, तेल, बेसनपीठ, मिरची पावडर, हळद, मसाला, बिस्किट, साबण आदी जीवनावश्यक वस्तुंचा  समावेश आहे. (प्रत्येकी ७०० रूपये किमतीचे कीट) यावस्तु  प्रत्येक गावात जावून वाटप करण्यात येत असल्याचे श्री पाचुंदकर यांनी सांगितले.

माजी आमदार सूर्यकांत पलांडे व पोपटराव गावडे, प्रकाश पवार, प्रदीप वळसे पाटील, जिल्हा परिषद सदस्य स्वाती पाचुंदकर, सुनिता गावडे व सविता बागाटे, उपसभापती सविता पऱ्हाड, विश्वास कोहकडे,  सुभाष उमाप, अरुणा घोडे, रंगनाथ थोरात, राजेंद्र गावडे, शंकर जांभाळकर,  केशर पवार आदी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्या-त्या गावात जिवनावश्यक वस्तुंचे किट्स वितरण करण्यात येत आहे.
दरम्यान मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी ३९ गावांमधील डॉक्टर, नर्स, आशा वर्कर व आरोग्य कर्मचारी यांना सँनिटायझर व मास्कचे वाटप केले असून, आगामी काळातही कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मदत केली जाणार असल्याचे श्री. पाचुंदकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT