sujata mane.jpg 
पुणे

गेले चार महिने 'ती' वाघिण लढतीये कोरोनाबाधितांसाठी...

सुषमा पाटील.

रामवाडी (पुणे) : श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता, अंगात ताप आलेला त्याच बरोबर दम ही लागत असल्याने खासगी रुग्णालयात उपचार घेतले. कोरोना चाचणी केली असता ती निगेटीव्ह आली. त्यानंतर काहीकाळ घरी आराम करून पुन्हा खराडी येथील कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी डॉ. सुजाता किरण माने सज्ज झाल्या. कुटुंब व हॉस्पिटल या दोन्ही ठिकाणी भूमिका बजावताना सुरुवातीला त्यांची मात्र, तारेवरची कसरत होत होती. तरी न डगमगता त्या आपलं कर्तव्य चोखपणे बजावत होत्या.

एप्रिल महिन्यापासून डॉ. माने या खराडीतील रक्षकनगर कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण त्या ठिकाणी आल्यावर त्याचा बीपी, शुगर तपासणे ऑक्सिजन घेण्याची त्या रुग्णाची क्षमता तपासणे, सर्दी खोकला असेल तर औषध देणे व्हिटॅमिन 'सी'च्या टॅबलेट देणे,  नविन पेशंटचे नाव नोंदणी करणे,  एकाच वेळी जास्त पेशंट आल्यावर बेड नसेल अशा वेळी वॉर्ड ऑफिसरशी बोलून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्या रुग्णांची सोय करून देणे. दहा दिवसाने जाणाऱ्या पेशंटला आदल्या दिवशी घरी गेल्यावर कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे या विषयी मार्गदर्शन करणे अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्या पार पाडत आहे.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घर व घरातील व्यक्तीचा त्यांना पाठिंबा व सहकार्य मिळत आहे. पती अभियंता आहे. सध्या ऑफिसची कामे ते घरातून करत असताना तीन वर्षाचा लहान मुलगा व बारा वर्षाची मुलगी यांची काळजी घेतात असे डॉ. माने यांनी सांगितले. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने अनेक डॉक्टर आपल्या तब्येतीची काळजी न करता रुग्णावर उपचार करत आहेत. तरीही नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच मास्क वापरावा, सोशल डिस्टंन्स पाळणे हे सर्व नियमांचे पालन केले तर कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल व डॉक्टरांवर येणारा ताण नक्कीच कमी होईल.

 
माझ्या पतीचे तसेच डॉक्टर स्टाफचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत असल्याने या कठीण प्रसंगात न डगमगता मी कोरोना रुग्णांवर उपचार करते. ज्यावेळी हे पेशंट बरे होतात. ते घरी जाताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा माझ्यासाठी अनमोल आहे.

-डॉ. सुजाता माने.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : पुढील २४ तास धोक्याचे ! राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; 'या' ८ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Vidarbha News: राज्यातील शाळांमध्ये पटपडताळणी मोहीम; शाळांमध्ये ११, १५ आणि २२ एप्रिलला तीन दिवस पटपडताळणी प्रक्रिया

Nagpur News: गटारावरील झाकणे ठरताहेत धोकादायक; वर्दळीच्या रामदासपेठेत सुरक्षेला तडा ; मनपाचा बेजबाबदारपणा उघड

Nagpur News: रेशनमधून केरोसीन, हॉटेल्सना पीएनजीची सक्ती!; जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज हॉटेल व्यावसायिकांची बैठक

Nagpur News: मनपाची संपूर्ण मालमत्ता येणार डिजिटल ट्रॅकवर; एका क्लिकवर मिळणार संपूर्ण कामांचा इतिहास, खर्च आणि देखभालीची माहिती

SCROLL FOR NEXT