corona1
corona1 
पुणे

पुरंदर तालुक्यात कोरोनाचा सहावा बळी

सकाळवृत्तसेवा

पुणे : पुरंदर तालुक्यात आज कोरोनाचे सहा रुग्ण सापडले, तर जेजुरी येथील एका ज्येष्ठ महिलेचा कोरोना मृत्यू झाला आहे. तालुक्यात कोरोनामुळे आतापर्यंत एकूण सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सासवड  : पुरंदर तालुक्यातील सासवड शहरातील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून येण्यात खंड नाही. आजही तीन रुग्ण मिळून आले. तसेच, जेजुरी, सोनोरी, उदाचीवाडी या गावांमधून प्रत्येकी एक, असे तालुक्यात 6 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यातून पुरंदरची आजच्या रुग्णांसह संख्या 173 वर पोचली. एकटे सासवड 112 वर गेल्याने काळजी वाढली आहे.

सासवड शहरातील लाॅकडाउन वाढण्याची शक्यता असतानाच जेजुरी व ग्रामीण भागातील रुग्णही वाढत आहेत. दोन आठवड्यात सासवड शहराने व पाठोपाठ ग्रामीण भागाने पुन्हा उसळी मारली. तर, शहरापाठोपाठ  ग्रामीणमधील संसर्गाचा वेगही या आठवड्यात वाढून रुग्ण पाॅझिटिव्ह आले. आजअखेर तालुक्यातील तब्बल 28 गावात कोरोना संसर्ग पोचला आहे. तर, कोरोनामुळे आतापर्यंत पाच बळी गेले. परिस्थिती गंभीर होत असल्याने प्रशासकीय मंडळींची धावपळ वाढली आहे.

जेजुरी : जेजुरीत कोरोनाबाधित ७२ वर्षीय महिलेचा आज मृत्यू झाला.जेजुरी शहरातील कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू होण्याची ही 
पहिलीच घटना आहे. त्यामुळे जेजुरी परिसरात चिंतेचे वातारण आहे. पुरंदर तालुक्यात कोरोनामुळे आतापर्यंत एकूण सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
जेजुरी दोन महिने कोरोनामुक्त होती. नऊ मे रोजी पहिला रुग्ण सापडल्यानंतर जेजुरी कोरोनामुक्त झाली होती. मात्र,आठ जुलै रोजी दोन रुग्णांचे रिपोर्ट पॉझीटिव्ह आले. त्यानंतर गुरुवारी नऊ जुलै रोजी एका रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. संबंधित रुग्णाच्या कुटंबातील ज्येष्ठ महिलेचा (वय ७२) आज कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दरम्यान उपचार सुरु असताना या महिलेचा आज मृत्यू झाला. जेजुरीत पाच दिवसांचा जनता कर्फ्यु सुरू आहे. अत्यासेवक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद आहेत. दरम्यान तीन दिवसात चार रुग्ण सापडल्याने व त्यातील एका महिलाचा मृत्यू झाल्याने जेजुरीत चिंतेचे वातावरण आहे.

Edited by : Nilesh Shende   

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT