Pune Municipal
Pune Municipal Sakal
पुणे

हिरमुसलेले नगरसेवक खूष; ३० टक्के कामांना मिळाली मंजुरी

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे महापालिका निवडणुकीच्या (Pune Municipal Electiion) तोंडावर सहयादीतील कामांवर बंदी (Work Ban) घातल्याने हिरमुसलेल्या नगरसेवकांना (Corporator) खूष (Happy) करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. अर्थसंकल्पातील (Budget) सहयादीच्या एकूण कामांपैकी ३० टक्के कामांना मान्यता (Permission) देण्यात आली आहे. शहरात सुमारे ३३० कोटी रुपयांच्या कामाला लवकरच मुहूर्त मिळणार आहे. (Corporator Happy 30 Percent of the Work was Approved)

या पार्श्‍वभूमीवर स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची शनिवारी (ता. १२) बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. महापालिकेच्या २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात नगरसेवकांच्या सहयादीसाठी सुमारे ११०० कोटींच्या कामांसाठी तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये पादचारी मार्ग करणे, पेव्हिंग ब्लॉक्स बसविणे, सिमेंट रस्ता बांधणे, ड्रेनेज लाइन टाकणे, सीसीटीव्ही बसविणे, बाकडी खरेदी, रस्ता डांबरीकरण करणे यासह विविध प्रकारची कामे नगरसेवकांनी सुचविलेली असतात. निवडणुकीसाठी एका वर्षापेक्षा कमी कालावधी उरलेला आहे, आपापल्या प्रभागात नागरिकांना दिसतील अशी कामे करण्यावर नगरसेवकांचा भर आहे, त्याच दृष्टीने कामे सुचविलेली आहेत. यामध्ये सत्ताधारी नगरसेवकास सरासरी पाच कोटी तर विरोधी पक्षाच्या नगरसेवकास अडीच कोटी रुपये तरतूद केली आहे.

बैठकीत काय झाले?

  • महापालिकेचे सध्याचे उत्पन्न, महत्त्वाचे प्रकल्प, आरोग्य सेवेसाठी खर्च, वेतन व इतर प्रशासकीय खर्चाचा आढावा

  • सहयादीतील कामांवर चर्चा करताना सरसकट १०० टक्के कामांना मान्यता न देता पहिल्या टप्प्यात ३० टक्के कामे मंजूर करावीत असा प्रस्ताव

  • महापालिकेचे उत्पन्न वाढल्यास उर्वरित कामांना मंजुरी देण्याबाबत निर्णय

... म्हणून निर्णय

मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने सहयादीतील कामांवर बंदी घालण्यात आली होती. आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील वित्तीय समितीकडून सहयादीतील कामे मंजूर केली जात नव्हती. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. सहयादीतील कामांना मान्यता द्यावी यासाठी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांवर दबाव येत होता. त्या पार्श्‍वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.

सहयादीतील कामांना मंजुरी द्यावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून नगरसेवक करत होते. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ही कामे थांबवली होती. आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत महापालिकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात सहयादीतून ३० टक्के कामे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही प्रशासनाकडून केली जाईल.

- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT