पुणे

फुलांनी बहरले ‘काटेसावर’

CD

फुलवडे, ता. ६ ः फुलवडे (ता. आंबेगाव) येथे तसेच पश्चिम आदिवासी भागातील डोंगरदऱ्यांमध्ये मार्चच्या पहिल्या पंधरवड्यात काटेरी सायरी अर्थात ‘काटेसावर’ वृक्षावर गडद लाल, गुलाबी व रक्तवर्णी फुलांची उधळण होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
मार्च महिन्याच्या सुरुवातीस पानगळ झाल्यानंतर पूर्ण झाड फुलांनी बहरते आणि दूरवरून पाहताना ते गुलमोहरासारखे आकर्षक दिसते. या वृक्षाची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे फुलोऱ्याच्या काळात झाडावर एकही पान नसते. फक्त लालसर फुलांनी सजलेले झाड निसर्गसौंदर्याला वेगळीच शोभा आणते.
काही दिवसांनी ही फुले गळून पडतात व त्यापासून कळ्या तयार होतात. पुढे या कळ्यांचे फळ बनते. पूर्णपणे पिकल्यावर उष्णतेमुळे फळ फुटते आणि त्यातून कापसासारखा मऊ तंतुमय पदार्थ बाहेर पडून वाऱ्याबरोबर सर्वत्र पसरतो. त्या कापसाच्या टोकाशी असलेल्या बियांपासून पावसाळ्यात नवीन रोपे उगवतात. साधारण ४० ते ५० फूट उंच वाढणारा काटेसावर वृक्ष योग्य संरक्षण मिळाल्यास ५० ते ६० वर्षे जगू शकतो.
डोंगराळ व आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या या झाडाच्या काट्यांचाही विशेष उपयोग आहे. ग्रामीण भागात सायरीचा काटा ‘कात’ म्हणून वापरण्याची परंपरा दिसून येते. टणटणी या वनस्पतीच्या पानाला चुना लावून सायरीच्या काट्याचे तुकडे घालून तयार केलेले पान नागवेलीच्या पानासारखा स्वाद व थंडावा देते.

“काटेसावरचे शास्त्रीय नाव (बॉम्बक्स सिबा) असून फुले व फळांची भाजी करून खाल्ली जाते. तसेच कोवळ्या फळांचे काप करून सुकविले जातात. व वेळेनुसार वर्षभर भाजी म्हणून उपयोगात येते. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करणारी ही भाजी आदिवासी समाजात लोकप्रिय आहे. या वनस्पतीची फुले व देशी तुप वापरून भाजी करून खाल्ल्यास स्त्रियांमधील ‘ल्युकोरिया’ समस्येत आराम मिळतो. तसेच फुले रक्त शुद्धता व पाठदुखीवर उपायकारक आहेत. त्यामुळे या वृक्षाचे संवर्धन आणि जतन करणे ही काळाची गरज आहे.”
- अरविंद मोहरे, निसर्गप्रेमी, फुलवडे (ता. आंबेगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT