पुणे

मेपासून ड्रोनद्वारे गावठाणांची मोजणी

सकाळवृत्तसेवा

पुणे - राज्यातील गावठाणांची मोजणी करण्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाकडे चाळीस ड्रोन दाखल झाले आहेत. पुढील महिन्यापासून या मोजणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात होणार असून, या ड्रोनच्या माध्यमातून पुढील तीन वर्षांत राज्यातील ३६ हजार गावठाणांच्या मोजणीचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर गावठाणांतील रहिवाशांना आपल्या मालमत्तेची सनद मिळणार असून, जागेसंदर्भातील वाद संपुष्टात येणार आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने आणि गतीने जमीन मोजणीचे काम करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला होता. त्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने ड्रोनच्या वापराचा निर्णय घेण्यात आला. राज्यात प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग पुरंदर तालुक्‍यातील सोनोरी या गावी राबविण्यात आला होता. तो यशस्वी झाल्यामुळे राज्यातील सर्व गावठाणांची मोजणी ड्रोनद्वारे करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली होती. त्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाला ड्रोनच्या वापरासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. राज्यात जमीन मोजणीसाठी पहिल्यांदाच ड्रोनचा वापर करण्यात आला. या सुविधेमुळे सर्वसाधारण पद्धतीने गावठाण मोजणी करण्यासाठी १५ ते ३० दिवस लागतात. मात्र, ड्रोनच्या साह्याने फक्त एका दिवसात मोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे भूमी अभिलेख विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला होता, असे भूमी अभिलेखचे उपसंचालक किशोर तवरेज यांनी सांगितले.

ड्रोनद्वारे मोजणीचे फायदे 
  ड्रोनद्वारे मोजणी केल्यास वेळेत सर्वाधिक बचत 
  १५ ते ३० दिवसांचे काम एका दिवसात पूर्ण 
  ड्रोनद्वारे मोजणीची अचूकता अधिक 
  ड्रोनद्वारे मोजणीमध्ये खर्चातही ५० टक्के बचत होऊ शकते 
  मोजणी झालेल्या गावांतील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार
  जागेचे वाद मिटण्यास मदत होणार
  मालमत्तेवर कर्ज घेणे सहजशक्‍य होणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT