Couple killed in Pune-Bangalore highway accident 
पुणे

लाडक्या मुलाच्या ओढीने आई-वडिल निघाले पण, अखेर भेट झालीच नाही !

सकाळवृत्तसेवा

पुणे/ हडपसर : दवाखान्यात दररोज रुग्ण तपासायचे असल्यामुळे आपल्या माध्यमातून मुलाला कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी डॉक्टर आई व संगणक अभियंता पित्याने 5 वर्षाच्या लेकराला आजीकडे गावी ठेवले. तब्बल दिड महीना ते मुलापासुन दूर राहिले, शुक्रवारी रात्री ते मुलाला आणण्यासाठी कारने गावी निघाले आणि काळने कालाने घात केला, उंब्रज येथे  त्यांच्या कारचा अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला, ज्याच्या भेटीच्या ओढीने निघाले, त्या लाडक्या मुलाची भेट अखेर झालीच नाही !

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 
 

डॉ. अनुजा गावडे (वय 35) व अमित गावडे (वय 38 रा. हडपसर) असे अपघातात मृत्यु झालेल्या दाम्पत्यचे नाव आहे. ते हडपसर येथील साडेसतरानली गावात राहतात. डॉ.गावडे यांचा गावातच दवाखाना आहे, तर अमित हे खराडी येथील एका नामांकित कंपनीमध्ये संगणक अभियंता म्हणून कार्यरत होते. 

पुण्याला सावधानतेचा इशारा : कोरोना रुग्णांची संख्या वाढणार
पार्श्वभुमीवर डॉ.गावडे यांच्या दवाखान्यात तपासणीसाठी रुग्ण संख्या वाढली  होती. त्यांचा पाच वर्षाचा मुलगा अनिश यास आपल्यामुळे कोणत्याही प्रकारचा आजार नको, म्हणून त्यानी अनिशला दिड महिन्यापूर्वी त्याच्या बेळगावजवळ राहणाऱ्या आजीकडे ठेवले होते. तब्बल दिड महीना मूल आपल्यापासून दूर असल्यामुळे आई वडीलांचा जीव तुटत होता. अखेर कोरोनाचे निर्बंध थोडे शिथिल झाल्याचे पाहुन शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता मुलाला आणण्यासाठी स्वत:च्या कारने महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर बेळगाव जवळ असलेल्या त्यांच्या गावी निघाले होते.

आणखी वाचा - पुण्यात आयटी कंपन्यांमध्ये सुरू झाली पगार कपात
दरम्यान, शनिवारी पहाटे पावणे पाच वाजता उंब्रजजवलील भोसलेवाड़ी येथे अमित यांचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावरील दुभाजकावर आदळली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने दोघांचा जागीच मृत्यु झाला. ज्याच्या भेटीच्या ओढ़ीने आई-वडिल निघाले त्या लाडक्या मुलाची भेट अखेर झालीच नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT