गाळेधारकांची याचिका
न्यायालयाने फेटाळली
मंगळवेढा, ता. २६ : सील केलेले गाळे पुनःश्च ताब्यात देण्याबाबतची कृषी उत्पन्न बाजार समितीविरुद्धची याचिका दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावली.
मंगळवेढा कृषी उत्पन्न समितीचे पंढरपूर रस्त्यालगत गाळे असून यातील काही गाळेधारकांनी बाजार समिती नियमानुसार पूर्तता न केल्याने गाळे सील करण्यात आले. त्याविरोधात गोपीनाथ रामचंद्र माळी, अजय ज्ञानेश्वर गवळी, विजय राजाराम खडतरे, रामचंद्र काशीनाथ गवळी, कबिर भिवा शेवडे, शशिकांत हरिदास हेंबाडे व सिद्धेश्वर गुराप्पा माळी यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीविरुद्ध याचिका केली. सील केलेले गाळे पुनःश्च ताब्यात देण्याबाबत आदेश द्यावेत अशी याचिका दिवाणी न्यायालयात दाखल केली होती. परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीकडून योग्य व रितसर माहिती न्यायालयासमोर सादर केली. गाळेधारकांची याचिका फेटाळण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने विधिज्ञ म्हणून ॲड. इरफान महिबूब सय्यद, ॲड. प्रतिक बसवेश्वर बुरकूल व कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढा यांच्यावतीने सचिव सचिन मानसिंग देशमुख व निरिक्षक दत्तात्रय कांबळे यांनी काम पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.