पुणे

‘वेट गेन’, ‘वेट लॉस’ची क्रेझ

सकाळवृत्तसेवा

पुणे - सुडौल दिसण्यासाठी वजन कमी करण्याबरोबरच वजन वाढविण्याचीही क्रेझ आली आहे. थंडीचा हंगाम सुरू झाल्यामुळे स्लीमिंग सेंटर्स बहरू लागली आहेत, तर ‘डायट’च्या माध्यमातून ‘वेट गेन’ करण्याचाही कल वाढला आहे. गमतीची गोष्ट म्हणजे वजन कमी करणाऱ्यांपेक्षा वजन वाढविण्याची इच्छा असलेल्यांची संख्या जास्त असून त्यात ३० ते ४५ वयोगट आघाडीवर आहे. 

आरोग्य चक्रासाठी हिवाळा हा आदर्श ऋतू समजला जातो. त्यामुळे अनेकदा आरोग्यासाठीचे संकल्प या काळात सोडले जातात. त्यानुसारच वजन कमी करण्यासाठी आता जिम ऐवजी स्लीमिंग सेंटर्सचा वापर वाढता आहे. विशिष्ट व्यायाम आणि आहाराची सांगड घालून ८ दिवसांत अगदी 

५ किलो वजन कमी करून देतो, असेही दावे या सेंटर्समधून करण्यात येतात. तर ज्यांना वजन वाढवायचे आहे, त्यांच्यासाठीही अशीच सांगड घालून त्यांचेही वजन वाढवून देण्याचे आश्‍वासन दिले जाते. अर्थात त्यासाठी मोठे मासिक किंवा तिमाही शुल्क आकारले जाते. शहरातील स्लीमिंग सेंटर्सच्या अनेक संचालकांशी संवाद साधल्यावर ‘वेट लॉस’ आणि ‘वेट गेन’चा व्यवसाय सध्या तेजीत असल्याचे दिसून आले.   

कला-अभिनय क्षेत्राबरोबरच नोकरी, उद्योग- व्यवसाय क्षेत्रात सुडौलत्वाबद्दल जागरूकता वाढत आहे. त्यामुळे वजन जास्त असणाऱ्यांपुढे ते कमी करण्याचे तर, ज्यांचे वजन कमी आहे, त्यांना ते वाढविण्याचे आव्हान पेलावे लागते. त्याला युवक- युवती असा अपवाद नाही. स्लीमिंग सेंटर्सच्या पायऱ्या चढणाऱ्यांमध्ये ३० ते ४० वयोगट जास्त आहे, असे काही सेंटर्सच्या संचालकांनी सांगितले. वजन कमी करणाऱ्यांचे प्रमाण ४०-४५ टक्के असेल, तर वजन वाढले पाहिजे, असे वाटणारा वर्ग सुमारे ५०-५५ टक्के आहे, असेही त्यांनी नमूद केले. 

वेट गेन अथवा वेट लॉस करण्यासाठी आमच्या सेंटरला अगदी ३० ते ७० वर्षांपर्यंतचे ग्राहक येतात. आरोग्यासाठी वेळ कमी मिळत असल्याने वजन कमी-जास्त होते. त्यामुळे जीवनशैलीही बदलत चालली आहे.
- मंजिरी लधाटे, स्लीमिंग सेंटर चालक 

नोकरीच्या ठिकाणी रोज १० तास मला बसून काम करावे लागते. त्यामुळे पोटावर चरबी वाढली आहे. त्यामुळे सुडौल होण्यासाठी एका स्लीमिंग सेंटरमध्ये मी जात आहे. त्याचा काही प्रमाणात उपयोग होऊन वजन कमी होऊ लागले आहे. 
- विष्णू चव्हाण, नागरिक

अनेकदा भूक लागत नाही. खावेसे वाटले तर, हॉटेलमधून फास्टफूड मागवून वेळ मारून नेते. पण मैत्रिणी मला बारीक म्हणतात. त्यामुळे मी आता आहार समुपदेशकांच्या मार्गदर्शनाखाली प्रथिनयुक्त पावडर खाण्यास सुरवात केली आहे.
- सुकन्या, स्लीमिंग सेंटरमध्ये जाणारी युवती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

Water Crisis: देशासमोर पाण्याचे संकट, 150 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी घसरली

लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना चुकीचं म्हणता येणार नाही- हायकोर्ट

Panchayat 3 Release Date Out: प्रतीक्षा संपली! 'पंचायत-3' ची रिलीज डेट जाहीर, 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार सीरिज

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आईही मैदानात

SCROLL FOR NEXT