CBI
CBI 
पुणे

जीएसटीचे दोन अधिकारी लाच घेताना जाळ्यात

सकाळवृत्तसेवा

पुणे - जीएसटी कमी करून देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विभागाच्या अधीक्षक आणि निरीक्षकास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी अटक केली. 

अधीक्षक विवेक देकाते आणि निरीक्षक संजीव कुमार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी त्यांना २९ मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. 

तक्रारदार हे कर सल्लागार आहेत. त्यांची पत्नी खोपोली-खालापूर येथील एका हॉटेलमध्ये भागीदार आहे. या हॉटेलचा २०१६-२०१७ सालचा सेवाकर कमी करून देण्यासाठी देकाते आणि कुमार यांनी तक्रारदारांकडे पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र, तडजोडीअंती तीन लाख रुपये देण्याचे ठरले. 

सीबीआयच्या पथकाने डिजिटल व्हाइस रेकॉर्ड केल्याने लाचखोरीची खातरजमा झाली. लाचेचा पहिला हप्ता म्हणून कुमार याने जीएसटी कार्यालयात तक्रारदाराकडून एक लाख रुपये स्वीकारले. देकाते त्याठिकाणी उपस्थित होते. त्या वेळी सीबीआयने दोघांना अटक केली.

देकातेच्या घरात २० लाख सापडले 
अटकेनंतर दोघांची कार्यालये, घर आणि मालमत्तेची सीबीआयने तपासणी केली. देकाते यांच्या घराची झडती घेतली असता २० लाख रुपयांची रोकड मिळाली. याबाबत अधिक माहिती देण्यास सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT