crime news fake pancard and voting card makers got arrested pune
crime news fake pancard and voting card makers got arrested pune esakal
पुणे

बनावट मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड तयार करुन देणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बनावट मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड तयार करून देणाऱ्या एका व्यक्तीला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पुणे स्टेशन परिसरातुन अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून दहा बनावट मतदार ओळखपत्र जप्त केली. तसेच त्याच्याकडील कॉम्पुटरमध्ये बनावट मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड बनविल्याचेही पोलिस तपासात आढळून आले. कल्पेश रमेश बोहरा (वय 42, रा. नम्रता सदन, खामगाव, बुलढाणा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी मधुकर तुपसौंदर यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोहराचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. तसेच तो नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन त्यांना बनावट मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड तयार करून देत होता. याबाबतची माहिती खंडणी विरोधी पथकास मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी पुणे स्टेशन परिसरात सापळा लावून त्यास पकडले. बोहराकडून वेगवेगळ्या व्यक्तीच्या नावाची दहा बनावट मतदार ओळखपत्र जप्त करण्यात आली आहेत. याबरोबरच त्याचा कॉम्पुटर जप्त करण्यात आला असून त्यामध्येही काही जणांची नावाने बनावट मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड तसेच काहीजणांची छायाचित्रे आढळून आली आहेत. बोहरा हा बनावट मतदार ओळखपत्र तयार करुन देण्यासाठी दहा हजार रुपये घेत होता. अशी प्राथमिक माहिती त्याच्या चौकशीतुन पुढे आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक जाधव करीत करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: ऋतुराज गायकवाडने जिंकला टॉस; बेंगळुरू-चेन्नई संघात मोठे बदल; जाणून घ्या प्लेइंग-11

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

SCROLL FOR NEXT