crime pistol Attempt to extort cash from wine shop owner at Narhe pune police sakal
पुणे

Pune Crime : नऱ्हे येथे पिस्तुलचा धाक दाखवून वाईन शॉप मालकाकडून रोकड लुटीचा प्रयत्न

लोक जमल्याने हवेत गोळीबार करून चोर पसार

विठ्ठल तांबे

धायरी  : नऱ्हे येथील वाईन शॉप मालकाच्या हातून पैशांची बॅग हिसकावून घेण्याचा प्रकार २ लुटारुंनी केला. मात्र कामगार आणि नागरिक जमा झाल्याने लुटारु हवेत गोळीबार करून पसार झाले. ही घटना नऱ्हे येथील नवले हॉस्पिटलच्या मागील गेट जवळील हिरो वाईन्स परिसरात घडली.

याबाबत तुकाराम सोपान इंगळे (वय ५७, रा. शिवणे, पुणे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दोन अनोळखी लुटारूविरोधात तक्रार दिली. तुकाराम इंगळे यांच्या मालकीचे नऱ्हे परिसरात हिरो वाईन्स वाईन्स शॉप आहे. रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ते दुकान बंद करून गाडीत बसत होते. धायरी फाट्याच्या दिशेने एका दुचाकीवर दोघेजण आले.

पुढे बसलेल्या काळया रंगाचा शर्ट घातलेल्या व मागील बाजुस बसलेल्या पांढरा शर्ट घातलेल्या तरुणांनी दुचाकीवरून खाली उतरुन इंगळे यांच्याजवळ येवून पिस्तुलाचा धाक दाखवला. इंगळे यांच्या बॅगेतील २ लाख २९ हजारांची रोकड हिसकावण्याचा प्रयत्न केला.

परंतु इंगळे यांनी ती बॅग घट्ट पकडल्याने चोरांना पैशांची बॅग मिळाली नाही. दरम्यान दुकानातील कामगार व नागरिक जमा झाले. ते पाहून  तरुणांनी पिस्तुल हवेच्या दिशेने रोखून त्यातील एक गोळी झाडली. त्यानंतर ते महाराष्ट्र बँकेच्या दिशेने पसार झाले. याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Gavit: सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला अडीच तास ताटकळत ठेवलं! दिलीप गावित यांचा राज ठाकरेंवर संताप

Karamad-Ladsawangi Accident : करमाड–लाडसावंगी रस्त्यावरील खड्ड्यांचा तिसरा बळी; भरधाव टेम्पोच्या धडकेत ७९ वर्षीय वृद्धेचा मृत्यू, चालक फरार

Marathi News Live Updates: प्रत्येकाने संविधानावर बोलायलाच हवे - पंकजा गोपीनाथ मुंडे

Godavari Fisherman Electrocuted: गोदावरीच्या पुरात मासेमारी करताना मच्छीमाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; नदीत उतरलेल्या वीजप्रवाहावरून ग्रामस्थांचा संताप

Rajgad Khopadewadi funeral crisis: राजगड परिसरातील खोपडेवाडीत ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार; स्मशानभूमीअभावी ग्रामस्थांचा संताप उफाळला

SCROLL FOR NEXT