Schoolgirl sexually abused Action definitely taken holding school responsible Education Commissioner pune  Sakal
पुणे

शाळेला निश्चितच जबाबदार धरून कारवाई होणार : शिक्षण आयुक्त

प्राथमिक तपासादरम्यान शाळेला जबाबदार कर्मचाऱ्यावर कारवाईचे दिले आदेश

मीनाक्षी गुरव

पुणे :‘‘शाळेत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना अत्यंत निंदनीय आहे. या घटनेबाबत उपसंचालकांमार्फत शाळेत तातडीने प्राथमिक चौकशी केली आहे. शाळेमध्ये बाहेरील व्यक्ती आली कशी?, याबाबत निश्चितच शाळेला जबाबदार धरण्यात येईल. शिक्षण विभागामार्फत होणाऱ्या चौकशीत शाळा दोषी आढळल्यास निश्चितच शाळेवर कारवाई होईल,’’ अशी माहिती राज्य शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी ‘सकाळ’शी दिली. तसेच पुढील काळात अशा घटना घडू नयेत, म्हणून काही ठोस कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येतील, असेही मांढरे यांनी स्पष्ट केले.

शाळेत असताना एका अल्पवयीन मुलीवर एका अनोळखी व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हा करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. परंतु शाळा सुरू असताना घडलेल्या गैरप्रकाराबाबत शाळेवर काय कारवाई होणार, याबाबत विचारले असता मांढरे यांनी ही माहिती दिली. ‘‘संबंधित शाळेत घटना घडल्याची माहिती मिळताच, तातडीने शिक्षण उपसंचालक औंदुबर उकिरडे यांना शाळेत प्राथमिक तपासासाठी पाठविण्यात आले. यावेळी सीसीटीव्ही पाहता गुन्हा करणाऱ्या व्यक्तीने शाळेत प्रवेश केल्याचे दिसून आले. या प्रकरणी सुरक्षा यंत्रणेची जबाबदारी असणाऱ्या कर्मचाऱ्यावर आणि संबंधितांवर शाळेने तातडीने कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत. शाळेकडून ही कारवाई करण्यास दिरंगाई झाल्यास शाळेला तातडीने जाब विचारण्यात येईल.’’, असेही मांढरे यांनी सांगितले.

मांढरे म्हणाले, ‘‘शिक्षणाच्या प्रवाहातून मुली बाहेर पडण्यामागे मुख्य कारण हे त्यांची सुरक्षितता आहे. पालकांना मुलींच्या सुरक्षिततेची चिंता वाटते, त्यामुळे त्यांना शाळेत पाठविले जात नाही, हे वास्तव आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला (एससीईआरटी) विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत शाळांमध्ये काय उपाययोजना करता येतील, हे सुचविण्यास सांगितले आहे. पुढील काळात अशा घटना घडू नयेत, म्हणून राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविता येतील का? किंवा अन्य काय कायमस्वरूपी उपाययोजना करता येतील, हे तपासण्यात येत आहे. तसेच अशा घटनांमध्ये संबंधित संस्थेवर देखील जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे.’’

‘‘शाळांवर कारवाई करताना मान्यता रद्द करणे, संलग्नता रद्द करणे अशी कठोर पावले उचलणे सयुक्तिक ठरणार नाही. कारण शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा फटका बसेल. अशा घटनांमध्ये शाळांना निश्चित जबाबदार ठरवून कारवाई करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. तसेच दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे. त्यामुळे उपसंचालकांमार्फत तातडीने चौकशी करण्यात येईल. यात शाळा दोषी आढळल्यास, शाळेने बाहेरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवले नसल्याचे निदर्शनास आल्यास आणि शाळेची सुरक्षिततेबाबत काही चूक झाल्यास निश्चितच शाळेवर कारवाई केली जाईल.’’

- सूरज मांढरे, राज्य शिक्षण आयुक्त

विद्यार्थ्यांची संख्या

तपशील : राज्य : पुणे जिल्हा

विद्यार्थी : १,००,८०,१२६ : ८,८८,८९६

विद्यार्थिनी : ८९,८९,७८५ : ७,७७,०६७

एकूण : १,९०,६९,९११ : १६,६५,९६३

शाळांची संख्या

तपशील : राज्य : पुणे जिल्हा

मुलांच्या शाळा : १,२३४ : १४३

मुलींच्या शाळा : २,१३३ : २०१

मुले-मुली एकत्रित असणाऱ्या शाळा : १,१०,१५९ : ७,२८५

एकूण : १,१३,५२६ : ७,६२९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT