crime theft case two youth steal money shop owner pargaon indian currency pune crime
crime theft case two youth steal money shop owner pargaon indian currency pune crime  sakal
पुणे

Pune Crime : दोन तरुणांनी; २०००, ५०० रुपयांची नोटा पहायचे नाटक करून सिनेस्टाइलने लांबवले ३३ हजार रुपये

सुदाम बिडकर

पारगाव : पारगाव ता. आंबेगाव येथे काल गुरुवारी रात्री पावणेनऊ वाजता दुकान बंद करत असताना अचानक दुकानात शिरलेल्या दोन उच्चभ्रु तरुणांनी इंग्रजीमध्ये संवाद साधत आम्हाला इंडियातील करन्सी पहायची आहे पाचशे रुपयांची नोट दाखवा , दोन हजार रुपयांची नोट दाखवा अशा प्रकारे बोलण्यात गुंतवुन काऊंटर वर असलेल्या बँगेतील ३५ हजार रुपये लंपास करून कार मधून सिनेस्टाइलने पलायन केले.

येथील अष्टविनायक महामार्गालगत विलास दाते यांचे प्रगत बाजार व प्रगत शेतकरी कृषी एजन्सी हि दोन दुकाने शेजारी शेजारी आहे. प्रगत शेतकरी कृषी एजन्सी या दुकानाचे व्यवस्थापक गणेश अवचिते दिवसाची जमा झालेली एकुण रक्कम ३३ हजार रुपये बँगेत ठेऊन बँग काऊंटरवर ठेऊन दुकान बंद करीत असताना कार मधून आलेल्या दोन उच्चभ्रु तरुण दुकानात आले ते विदेशी वाटत होते त्यांनी श्री. अवचिते यांना इंग्रजीमध्ये संवाद साधत आम्हाला इंडियातील करन्सी पहायची आहे.

असे सांगत पाचशे रुपयांची नोट दाखवा म्हणाले श्री. अवचते यांनी बँगेतील पैशातून पाचशेची नोट दाखवली त्यांतर ते म्हणाले आम्हाला दोन हजार रुपयांची नोट दाखवा त्यावेळी बँगेत दोन हजार रुपयांची नोट नसल्याने श्री. अवचिते हे त्या दोन तरुणांना शेजारील प्रगत बाजारमध्ये घेऊन गेले बँग तशीच काऊंटर ठेवली त्यावेळी त्यांच्या सोबत कार मध्ये बसलेला तिसरा तरूण कार मधून उतरून बँगेतील पैसे काढून पुन्हा कार

मध्ये जाऊन बसला शेजारच्या दुकानात गेलेले दोन्ही तरूण काही क्षणातच दुकानातून बाहेर येऊन कार मध्ये बसून कार जोरात पळवून पलायन केले कार का जोरात पळवली म्हणुन श्री. अवचिते यांना संशय आल्याने त्यांनी बँग तपासली असता बँगेतील पैसे त्या तरुणांनी लंपास केल्याचे लक्षात आले त्यांनी या संदर्भात पारगाव कारखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

काही दिवसापूर्वी अशाच प्रकारे मलठण (ता. शिरूर) येथील किराणा दुकानात दुकान बंद करते वेळी अशाच प्रकारे दोन उच्चभ्रु तरूण दुकानात जाऊन करन्सी पहायची आहे अये सांगून सुमारे पन्नास हजार रुपयांची रक्कम लांबवल्याची घटना घडली आहे तेथील सीसीटीव्ही फुटेज मधील ते दोन तरूण व काल पारगाव येथील घटनेतील तरूण एकच असल्याचे सीसीटीव्ही फुटेज वरून दिसत आहे गुन्हा करण्याची पद्धतही सारखीच आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: यश दयालने गुजरातला दिला दुहेरी दणका! राशिद खानपाठोपाठ तेवतियाही बाद

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT