Four IPL bettors arrested action of Crime Branch Unit Six
Four IPL bettors arrested action of Crime Branch Unit Six esakal
पुणे

आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या चार जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) मुंबईविरूद्ध लखनौ क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या चार जणांना गुन्हे शाखेच्या युनीट सहाच्या पथकाने वडकीनाला परिसरातुन अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून 10 मोबाईलसह 67 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. परेश मोहन भूत (वय 37 ) प्रफुल्ल नरेंद्र कलावटे(वय 37, दोघेही रा. गुरूवार पेठ), अक्षय पांडुरंग ठोंबरे (वय 26, रा. वडकीनाला), महेश राजेंद्र क्षिरसागर (वय 23, रा. वडकीनाला) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र भारतीय जुगार कायद्यानुसार लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये मुंबई विरुद्ध लखनौ या दोन संघाच्या सामन्याच्यावेळी वडकीनाला परिसरातील एका इमारतीमध्ये काहीजण सट्टा लावणार असल्याची खबर युनीट सहाच्या पथकास मिळाली होती.

त्यानुसार, रविवारी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी घटनास्थळी छापा मारून चौघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून 10 मोबाईल , कॅल्क्‍युलेटर, मार्कर पेन, नोंदवही असा 67 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपींनी सट्टा घेण्याकरीता बनावट कागदपत्रे सादर करून मोबाईल सीमकार्ड खरेदी केल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले. पोलिस निरीक्षक गणेश माने, सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलिस कर्मचारी मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे यांच्या पथकाने हि कामगिरी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

Video: मुलं आजूबाजूला खेळतायेत अन् कपल्सचा पार्कच्या मधोमध 'रोमान्स'; व्हिडिओ पाहून लोकांचा संताप

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

SCROLL FOR NEXT