crime Woman police inspector assaulted at abhiruchi police station pune  sakal
पुणे

Pune Crime : अभिरुची चौकीत महिला पोलिस निरीक्षकास धक्काबुक्की

एका महिला पोलिस निरीक्षकास कर्मचाऱ्याने धक्काबुक्की केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील अभिरुची पोलिस चौकीत घडली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : एका महिला पोलिस निरीक्षकास कर्मचाऱ्याने धक्काबुक्की केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील अभिरुची पोलिस चौकीत घडली. या प्रकरणी मुंबईतील पोलिस दलाच्या फोर्स वन पथकातील एका पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नीलेश आंद्रेस भालेराव (रा. कलिना पोलिस वसाहत, सांताक्रुझ, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिला पोलिस निरीक्षकाने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पोलिस निरीक्षक यापूर्वी राज्य गुप्तवार्ता विभागात कार्यरत होती.

भालेराव तेथे प्रशिक्षणासाठी आला होता. त्यावेळी त्याचा महिला पोलिस निरीक्षकाशी वाद झाला होता. याबाबत भालेराव याच्याविरुद्ध सरकारी कामकाजात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर भालेरावच्या कुटुंबीयांनी विनंती केल्यामुळे त्यांनी तक्रार मागे घेतली होती.

परंतु भालेरावने पुन्हा वारंवार फोन करून त्रास देण्यास सुरवात केली. त्यामुळे महिला पोलिस निरीक्षक पतीसमवेत अभिरुची पोलिस चौकीत तक्रार देण्यासाठी गेली होती. त्यावेळी भालेराव तेथे आला. त्याने महिला पोलिस निरीक्षकाशी धक्काबुक्की करून पायऱ्यांवर ढकलून दिले. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी भालेराव याच्याविरुद्ध विनयभंग आणि धक्काबुक्की केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलनातील धरपकडीची संयुक्त राष्ट्रांकडून दखल; आंदोलकांना ताब्यात घेतल्याबद्दल चिंता व्यक्त, भारताचे प्रत्युत्तर!

Jayasri Burman Paintings : जयश्री बर्मन यांच्या चित्रांत पुराणकथा आणि निसर्गाचे अनोखे विश्व

Crime News: कड्यावरून ढकलून प्रेयसीचा केली हत्या;लग्न ठरल्यामुळे भेटण्यास टाळाटाळ केल्याने कृत्य

RICH ZODIAC SIGNS 2027: २०२७ मध्ये ‘या’ राशींचं नशीब चमकणार! मेहनतीला मिळेल भाग्याची साथ, अचानक होऊ शकतो मोठा धनलाभ

Maharashtra Weather Update : मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार, तापमानाचा पारा ३९ अंशांपार, ६ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT