criminals who robbed houses in sinhagad road arrested valuables worth 19 lakhs seized Sakal
पुणे

Pune Crime News : सिंहगड रस्ता भागात घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांना अटक, १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ एप्रिल रोजी आनंदनगरमधील संतोष हॉलजवळ मधुरा बंगला सफलानंद सोसायटीमध्ये घरफोडी झाली होती.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर भागात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली. सिंहगड रस्ता पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून १९ लाख ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे.

संकेत प्रकाश निवंगुणे (वय २३, रा. बानगुडे चाळ संघर्ष चौक, वारजे माळवाडी) आणि सूरज शिवाजी भरडे (वय २४, रा. शिवसाईनगर, सुतारदरा, कोथरूड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ एप्रिल रोजी आनंदनगरमधील संतोष हॉलजवळ मधुरा बंगला सफलानंद सोसायटीमध्ये घरफोडी झाली होती. याबाबत सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या घरफोडीत चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी ३७ तोळे वजनाचे सोने, हिरे, पाचू आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त प्रवीण पवार, अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम आणि सहाय्यक आयुक्त भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विजय कुंभार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) राघवेंद्रसिंह क्षीरसागर, सहाय्यक निरीक्षक सचिन निकम, पोलिस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलिस कर्मचारी आबा उतेकर, संजय शिंदे, उत्तम तारू, राजू वेगरे, विकास बांदल, देवा चव्हाण, राहुल ओलेकर, सागर शेडगे, अमोल पाटील आदींनी ही कारवाई केली.

पोलिसांचे आवाहन

- सोने-चांदीचे दागिने, मौल्यवान वस्तू घरी न ठेवता बँकेतील लॉकरमध्ये ठेवाव्यात.

- बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना माहिती द्यावी

- सोसायटी आणि सदनिकेच्या परिसरात सीसीटीव्ही बसवावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad : समुद्रात बोट बुडाली! बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, थरारक व्हिडीओ व्हायरल, अनेकजण बुडाले

Maharashtra Latest News Update: हिंजवडी परिसरातील आयटी कंपनीतील 82 कोटी रुपयांच्या डेटाची चोरी

Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच संपवलं आयुष्य, सत्काराच्या शालने घेतला गळफास; बीडमध्ये खळबळ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

SCROLL FOR NEXT