mahesh
mahesh 
पुणे

पुणे - सांगवीतील महेश मंडळाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मिलिंद संधान

नवी सांगवी (पुणे) : सांगवी परिसर महेश मंडळातर्फे समाजउत्पत्ती दिनानिमित नुकतेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमास नगरसेविका माई ढोरे, शारदा सोनावणे, नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी सुनील लोहिया, सतीश लोहिया, निलेश अट्टल, दीपेश मालानी यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. 

यावेळी चिमुकल्यांसाठी घेण्यात आलेल्या फॅन्सी डे, एकल, युगल नृत्य व समूह नृत्य स्पर्धेत त्यांनी आपला कलाविष्कार सादर केला. यावेळी मुलांनी प्लास्टिकबंदी व पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती केली तर काहींनी सैनिक, डॉक्टर, फिजिओथेरेपिस्ट, वकील, अभिनेता आदी व्यक्तिमत्वाच्या वेशभूषा सादर केल्या. महिलांनी राजस्थानी समूह नृत्य सादर करताना अभिनेत्री श्रीदेवी यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या गाण्यावर समुह नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल भट्टड व पूनम काबरा यांनी केले तर परीक्षक म्हणून विक्रांत देव्हारे, वैशाली नाईक, मिलिंदकुमार यांनी भूमिका पार पाडली. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुकुंद तापडिया, गणेश चरखा, गजानंद बिहाणी, विवेक झंवर, हेमंत पल्लोड, पद्मा लोहिया यांनी परिश्रम घेतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT