Pune Porsche Accident|Aneesh Awadhiya Esakal
पुणे

Pune Porsche Accident: आता सायबर सेलची एन्ट्री! अल्पवयीन आरोपीच्या व्हिडिओ प्रकरणी केली कारवाई

पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात आत्तापर्यंत वेगानं घडामोडी घडल्यानंतर आता आणखी एक अपडेट आली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात आत्तापर्यंत वेगानं घडामोडी घडल्यानंतर आता आणखी एक अपडेट आली आहे. त्यानुसार, या प्रकरणात आता सायबर सेलची एन्ट्री झाली आहे. अल्पवयीन आरोपीच्या व्हिडिओ प्रकरणी सायबर सेलनं मोठी कारवाई केली आहे. (Cyber Cell of Pune Police has registered an FIR against a reel creator one other who made purported video)

पुणे पोलिसांच्या सायबर सेलकडून अल्पवयीन आरोपीचा बनावट व्हिडिओ बनवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. सायबर सेलनं हा बनावट व्हिडिओ तसेच रील बनवणाऱ्यावर तसेच आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीची सुटका करावी अशी मागणी या रील क्रिएटरनं व्हिडिओतून केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. पुणे पोलिसांच्या सायबर विभागानं भादंवि अंतर्गत कलम ५०९, कलम २९४ ब आणि आयटी अॅक्ट अंतर्गत कलम ६७ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

दरम्यान, पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा एक व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. हा व्हिडिओत एका रॅप साँगद्वारे त्यानं आपल्या बांधकाम व्यावसायिक वडिलांचा उल्लेख करताना आपण लगेचच जामिनावर कसे बाहेर आलो हे सांगितलं. तसंच आता माझ्यावर बोलण्याशिवाय तुमच्याकडं काहीही काम शिल्लक नाही का? असा सवाल करत मी पुन्हा रस्त्यावर उतरुन माझ्या मित्रांसोबत असाच खेळ करणार आहे, असं तो म्हणताना दिसतो आहे. या व्हिडिओतून त्यानं अनेकदा शिव्याही दिलेल्या दिसत आहेत.

पण हा व्हिडिओ फेक असून तो आपला मुलगा नाही. माझा मुलगा तर सध्या डिटेंशन सेंटरमध्ये आहे. त्यामुळं त्याच्याविरोधात असे खोटे व्हिडिओ व्हायरल करु नका, असं सांगताना या अल्पवयीन आरोपीच्या आई शिवानी अग्रवाल यांना अश्रू अनावर झाले होते. "माझी सर्व पत्रकार आणि सोशल मीडियातील ग्रुप्सना विनंती आहे की, त्यांनी अशी चुकीची माहिती पसरवू नये. याबरोबरच माझ्या मुलाला पोलिसांनी संरक्षण द्यावं," अशी विनंतीही शिवानी अग्रवाल यांनी आपल्या व्हिडिओतून केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT