पुणे

गुंतवणुकीच्या बहाण्याने ४२ लाखांना गंडा

CD

पुणे, ता. ११ : शहरात सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून सुशिक्षित नागरिकांना लाखो रुपयांना लुटल्याचे समोर येत आहे. हॉटेल रिव्ह्यू टास्क, शेअर मार्केटमधील गुंतवणूक आणि आरटीओ ई-चलन भरण्याच्या बहाण्याने शहरात चार घटनांमध्ये नागरिकांची सुमारे ४२ लाख रुपयाची फसवणूक केली.

हॉटेल रिव्ह्यूचा ‘टास्क’
सायबर चोरट्यांनी कात्रज परिसरातील एका ३८ वर्षीय तरुणाला टेलिग्रामवर हॉटेल आणि रिसॉर्टचे गुगल रिव्ह्यू देण्याचा टास्क दिला. या तरुणाला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवण्यात आले. गुंतवणुकीच्या बहाण्याने चोरट्यांनी या तरुणाकडून १२ लाख ३० हजार रुपये विविध खात्यांवर जमा करून घेत आर्थिक फसवणूक केली. आंबेगाव पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ज्येष्ठ महिलेची लूट
कोंढवा भागातील एका ६३ वर्षीय महिलेला चोरट्यांनी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी करून ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. शेअर बाजारात मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून चोरट्यांनी महिलेकडून १२ लाख ५० हजार रुपये उकळले. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ई-चलनच्या लिंकद्वारे फसवणूक
हडपसर येथील ५३ वर्षीय व्यक्तीला आरटीओ ई-चलन भरण्याबाबत एक लिंक पाठवण्यात आली. त्यांनी त्या लिंकवर क्लिक करताच चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलचा रिमोट ॲक्सेस मिळवला. बँक खात्याची माहिती चोरून चोरट्यांनी सहा लाख रुपये परस्पर काढून घेतले. काळेपडळ पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

अकरा लाख रुपये उकळले
सायबर चोरट्यांनी फुरसुंगी येथील एका तरुणाला टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर बनावट संकेतस्थळावर नोंदणी करण्यास भाग पाडले. ऑनलाइन टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने तरुणाकडून ११ लाख १७ हजार रुपये उकळले. याबाबत एका ३५ वर्षीय तरुणाने फुरसुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरीच्या प्रकरणात दोन गुजराती लोक विक्री करण्यात मग्न - काँग्रेस नेते परगट सिंग

SCROLL FOR NEXT