Hurricane sakal
पुणे

Hurricane : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत

नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) अंदमानमध्ये दाखल होऊन २४ तास होताच बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) अंदमानमध्ये दाखल होऊन २४ तास होताच बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. पुढील चार दिवसांमध्ये याचे रूपांतर चक्रीवादळात होण्याचे संकेत हवामान खात्याने सोमवारी दिले.

नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे, दक्षिण बंगालचा उपसागर, मालदीव आणि कोमोरिन भागात रविवारी दाखल झाले आहे. मॉन्सूनचा आजचा मुक्काम त्याच भागावर आहे. याचदरम्यान बंगालच्या उपसागरात बुधवारपर्यंत (ता. २२) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत हवामान खात्याने सोमवारी दिले आहेत.

उत्तरेकडे सरकताना त्याची तीव्रता वाढणार आहे. यातच वायव्य उत्तर प्रदेशात असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

उन्हाचा चटका वाढणार

राज्याच्या विविध भागांत पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत आहेत. तसेच उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान जळगाव येथे ४३.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले. राज्यात उद्या (ता. २१) तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा, तर कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे.

राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली. राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढू लागला आहे. उद्या कोकणात उष्ण व दमट हवामानाचा तर राज्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) -

ठाणे, रायगड.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) -

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ.

उन्हाचा चटका वाढला (अंश सेल्सिअसमध्ये) -

जळगाव ४३.९, नाशिक ४०.५, सोलापूर ४०.४, धाराशिव ४०, छत्रपती संभाजीनगर ४०.८, परभणी ४०.५, नांदेड ४०.६, बीड ४१.५, अकोला ४३.८, अमरावती ४२.८, बुलडाणा ४१.५, चंद्रपूर ४२, वर्धा ४१.८, यवतमाळ ४२.२.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT