पुणे

पुनाळेकर, भावेंची न्यायालयीन कोठडीत रवानगी 

सकाळ वृत्तसेवा

पुणे - केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) तपासात प्रगती नसल्याने आणि यापूर्वी पुरेशी कोठडी दिली आहे, असे नमूद करत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी ऍड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची न्यायालयाने मंगळवारी (ता. 4) न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. 

विशेष न्यायाधीश आर. एम. पांडे यांनी हा आदेश दिला. या प्रकरणातील आरोपी ऍड. पुनाळेकर आणि भावे यांची "सीबीआय' कोठडी संपल्याने दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले होते. ऍड. पुनाळेकर यांनी यापूर्वी अटक आरोपींना पिस्तूल नष्ट करण्याचा सल्ला दिला आहे, तर भावे याने घटनास्थळाच्या रेकीसाठी मदत केली आहे. त्यांच्याकडे तपास करून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करायची आहे. ऍड. पुनाळेकर यांच्याकडून जप्त केलेला मोबाईल आणि लॅपटॉपमधील डेटाचे विश्‍लेषण झालेले नाही. त्याचा फॉरेन्सिक रिपोर्ट येणे बाकी असल्यामुळे त्यांना 14 दिवसांची अतिरिक्त "सीबीआय' कोठडी देण्याची मागणी "सीबीआय'चे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी केली होती. तसेच आरोपींचे वकील आहेत म्हणून ऍड. पुनाळेकर यांना अटक करण्यात आलेली नाही, तर त्यांचा डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या मोठ्या कटात सहभाग आहे. त्यामुळे त्यांना अटक केल्याची माहिती ऍड. सूर्यवंशी यांनी न्यायालयाला दिली. 

"सीबीआय'ने आतापर्यंत सादर केलेल्या तीनही रिमांड रिपोर्टमध्ये कोठडीची कारणे सारखीच आहेत. कोठडीच्या कालावधीत "सीबीआय'ने कोणत्याही नवीन मुद्द्यावर तपास केलेला नाही. तसेच कोठडीचे मुद्देदेखील समाधानकारक नाहीत. प्रत्येक आरोपीला कोठडी देण्याच्या वेळी गुन्ह्यातील दुचाकी जप्त करण्याचे कारण "सीबीआय' देत आहे. मात्र, अद्याप ती दुचाकी जप्त झालेली नाही. पुरेशी कोठडी मिळाल्याने आरोपींना जामीन देण्यात यावा, असा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील ऍड. वीरेंद्र इचलकरंजीकर आणि ऍड. समीर पटवर्धन यांनी केला. 

तपासाचा अहवाल न्यायालयात सादर 
"सीबीआय'ने आज तपासाचा अहवाल बंद पाकिटाद्वारे न्यायालयात सादर केला आहे. न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्याने दोन्ही आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर सात जून रोजी "सीबीआय' आपले म्हणणे मांडणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Alyad Palyad: ‘अल्याड पल्याड’ चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार सिद्धयोगी साधूची भूमिका; लूकनं वेधलं लक्ष

ICICI Bank: NRI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; UPI संदर्भात नवीन घोषणा, जाणून घ्या प्रक्रिया

Latest Marathi News Update: जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना दोन महिन्यांसाठी अंतरिम वैद्यकीय जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT