dahini
dahini 
पुणे

पुण्यात सॅनिटरी पॅडच्या विघटनासाठी बनविले 'दाहिनी' यंत्र

सकाळवृत्तसेवा

 पुणे : मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी पॅड वापरण्याबाबत जागृती झाली. परंतू त्याची विल्हेवाट लावण्याची नवी समस्या उभी राहिली. देशभरात 100 टक्के स्त्रिया पॅड वापरत नाहीत. तरीही त्याच्या विघटनाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. सॅनिटरी पॅडची घरच्या घरी विल्हेवाट लावण्यासाठी ग्रीन अर्थ इक्विपमेंटचे रविंद्र गद्रे यांनी दाहिनी हे यंत्र निर्माण केली. प्रत्येक घरात किंवा इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर हे यंत्र लावणं सोयीचं होईल.

देशभरात 9 हजार टन सॅनिटरी पॅडचा कचरा साचतो. पण एक पॅड नष्ट करण्यासाठी शेकडो वर्षे लागतात. विल्हेवाटाची शास्त्रीय आणि पुरेशी यंत्रणा नव्हती. परंतू दाहिनीमुळे ती विल्हेवाट लावणं सोपं झाले आहे. दाहिनी या यंत्रावर रविंद्र गद्रे यांच्या सहकारी सायली पोंक्षे आणि गौतमी भोर यांनी शोधनिबंध सादर केला. इटलीमधील रोम इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये हा शोधनिबंध सादर केला गेला. कचऱ्यामधून सॅनिटरी पॅड माणसांद्वारेच बाहेर काढले जाते. त्यामुळे आरोग्याचा प्रश्नही उभा राहतो.

दाहिनीमध्ये सॅनिटरी पॅड टाकल्यानंतर 15 मिनिटांमध्ये त्याची राख होते. ती राख झाडांना खत म्हणूनही वापरता येते. त्याबरोबरच त्यामधून बाहेर पडणारा कार्बनडायऑक्साईड अत्यल्प प्रमाणात असतो. त्यामुळे हे यंत्र पर्यावरणपूरक आहे. सॅनिटरी कचऱ्यानंतर हॉस्पिटलमधील कचऱ्याबाबत काम करण्याचा त्यांचा मानस आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: धोकादायक डेव्हिड मिलर आऊट; सुरुवातीच्या धक्क्यांनंतर गुजरातचा सावरला डाव

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT