jejjuri 
पुणे

यळकोट यळकोट जय मल्हार...लॉकडाउनमध्येही जेजुरीकरांकडून खंडोबाची रोज पूजा...

तानाजी झगडे

जेजुरी (पुणे) : सरकारने लॉकडाउन जाहीर केले आणि गेल्या दोन महिन्यांपासून जेजुरीचे खंडोबा मंदीर बंद झाले. त्यामुळे राज्यभरातून येणाऱ्या अनेक भाविकांचे कुलधर्म कुलाचार राहुन गेले. मात्र, येथील पुजारी, देवसंस्थान व नित्य वारकरी यांनी खंडोबाची दररोजची त्रिकाळ पुजा सुरू ठेवली आहे. त्यामुळे भाविकांसाठी खंडोबा मंदीर बंद असले; तरी खंडोबाचे सर्व धार्मिक विधी मात्र नित्य नियमाने सुरु आहेत. 

खंडोबा मंदीर गेली दोन महिने बंद आहे. मात्र, दरवर्षी या काळात होणाऱ्या लग्नसोहळ्यांमुळे जेजुरीत खंडोबाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी असते. खंडोबाला येणाऱ्या भाविकांमुळे येथील व्यापारी पेठ गजबजलेली असते. व्यापारी व पुजाऱ्यांच्या दृष्टीने हा काळ आर्थिक भरभराटीचा असतो. यंदा मात्र याच काळात दोन महिने मंदीर बंद राहिले. त्यातून जेजुरीतील व्यापारी व पुजारी यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढविले आहे. मात्र, खंडोबाच्या दररोज होणाऱ्या त्रिकाळ पुजेला मात्र एकही दिवस खंड नाही. 

या त्रिकाळ पुजेसाठी सकाळी पाच वाजता मंदीर उघडले जाते. सात ते आठ जण दररोज पुजेसाठी उपस्थीत असतात. गेल्या दहा वर्षापासून पहाटेच्या पुजेला येणारे नित्य वारकरी चार ते पाच व पुजारी व सेवेकरी दोन जण उपस्थित असतात. साडेपाच वाजता देवाची भुपाळी सुरु होते. सहा वाजता आरती सुरु होते. सुमारे एक तास सर्व परंपरेनुसार विधी केला जातो. गेली दहा वर्षे पहाटेच्या नियमित पुजेला असणारे नित्य वारकरी यांनी भुपाळीची परंपरा लॉकडाउनच्या काळातही चालूच ठेवली आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुजारी नितीन बारभाई, बाळासाहेब बारभाई, नित्य वारकरी जालिंदर खोमणे, किसन कुदळे, मधुअण्णा खोमणे, चंद्रकांत खेडेकर, बंडा गोसावी, सोमनाथ उबाळे व सेवेकरी रत्नाकर मोरे, रोहन मोरे व देवसंस्थानचे कर्मचारी या पुजेचे गेली काही दिवसापासून नियोजन करीत आहेत. दुपारची व रात्रीची पुजारी व सेवकरी करतात. मंदीर बंद असले; तरी पुजारी नित्य नियमाने पुजा करतात. पुजेसाठी लागणारे साहित्याचे ते नियोजन करतात. देवसंस्थानच्यावतीने त्यांना मदत केली जाते. मंदीर बंद असले, तरी पुजारी व नित्य वारकरी खंडोबाचे दररोज पारंपारिक पध्दतीने धार्मिक विधी न चुकता ठरलेल्या वेळी करीत असल्याचे सोमनाथ उबाळे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital RCC Slab Collapse : माणुसकी धावून आली अन् ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या 7 कामगारांचा बचावला जीव; मिरजेत अंगावर काटा आणणारं दृश्य

लाज वाटत नाही?... जुई गडकरीचा डीपफेक VIDEO व्हायरल; सुपरस्टार मराठी कपलच्या मुलासोबत जोडलं नातं, कोण आहे तो?

Solapur Politics: ‘नातू’ शिकवू लागले, पण ‘आजोबा’ आजोबाच! अमोल शिंदेंचा देशमुखांच्या भाजपअंतर्गत विरोधकांना टोला; चंद्रकांतदादांचे ‘देर है, अंधेर नहीं’

Marathi News Live Updates : राम मंदिर देणगी चोरी प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर आज सुनावणी

Satara DCC Bank: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा; १० वर्षांच्या संचालकांवर टांगती तलवार?

SCROLL FOR NEXT