साते - येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात श्रमसंस्काराच्या माध्यमातून ओढ्यावर बंधारा बांधण्यात आला. या वेळी श्रमदानात सहभागी झालेले विद्यार्थी.
साते - येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात श्रमसंस्काराच्या माध्यमातून ओढ्यावर बंधारा बांधण्यात आला. या वेळी श्रमदानात सहभागी झालेले विद्यार्थी. 
पुणे

विद्यार्थ्यांनी बांधला साते येथे वनराई बंधारा

सकाळवृत्तसेवा

कामशेत - पुण्याच्या अरिहंत कॉलेज, पूना कॉलेज व अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिरात विद्यार्थ्यांनी साते येथे वनराई बंधारा बांधला.

शिबिराचे उद्‌घाटन पोलिस पाटील शांताराम सातकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ. किरण भिसे उपस्थित होते. शिबिरात स्वच्छतेबाबत सर्वेक्षण व जनजागृती करण्यात आली. ग्रामस्वच्छता मोहिमेअंतर्गत पंचवीस पोती प्लॅस्टिकचा कचरा संकलित केला. 

जलव्यवस्थापन व जलस्रोत स्वच्छता यासाठी पथनाट्ये सादर करून अभियान राबविण्यात आले. साते ओढ्यावर वनराई बंधारा बांधला. पारवडी गावातही स्वच्छता केली. चंदन लागवड जनजागृती व मोफत बियाणाचे वाटप करण्यात आले. याशिवाय बेटी बचाव, बेटी पढाओ यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन कार्यक्रम अधिकारी जमीर सय्यद, अकबर सय्यद, प्रा. संग्राम काकडे, रमजाण वारुणकर, दिलनवाज पठाण यांनी केले आहे. अक्षय नायकडे, श्रद्धा ढवळे, मुद्दसर शेख, शहबाज देशमुख, मीलाक्षी झुंबरे, शाहीन शेख मारूफ खान यांच्या नेतृत्वाखाली हे उपक्रम राबविले जात आहेत. सक्षम युवक या विषयावर डॉ. शाकीर शेक, सेवा योजना सेवेतून समृद्धीकडे डॉ. बाबा शेख जोहेब हसन, राणी पोटावले यांची मार्गदर्शनपर व्याख्याने झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT