पुणे

स्ट्रीट डान्सरने जिंकले २५ लाख

अरुण सुर्वे

पुणे - घरात अठराविश्‍वे दारिद्र्य, आई-वडील मोलमजुरी करायचे अन्‌ मी दहावी नापास...पण, मला डान्सची आवड होती...पैशांअभावी प्रशिक्षणही घेता आलं नाही...त्यामुळे रस्त्यांवरच डान्स करू लागलो... ऑडिशन देत होतो; यश येत नव्हतं...पण, हिंमत हरलो नाही. स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी ‘डान्स प्लस ४’ या रिॲलिटी शोचा विजेता होईन...२५ लाखांचे बक्षीस जिंकणारा दापोडीचा चेतन साळुंखे सांगत होता...

चेतन दापोडीतील वस्तीत राहतो. त्याला डान्सची आवड. त्यासाठी तो पाच वर्षांपासून कष्ट घेत होता. अनेकांनी त्याला टीव्हीवरील डान्सच्या शोमध्ये नेण्याचे आश्‍वासन दिले. यात तीन वर्षे गेली. पण, काहीच झाले नाही. शेवटी तो वस्तीतील रस्त्यांवरच डान्स करू लागला. घरची परिस्थिती हलाखीची. 

आई घर चालवायची, पण वडिलांना काम नव्हते. त्यामुळे चेतनही काम करू लागला. हे करतानाच आईकडून पैसे घेऊन तो ऑडिशन देत असे. पण, यश येत नव्हतं. मात्र, तो हिंमत हरला नाही.

याबाबत चेतन म्हणाला, ‘‘वस्तीत मी रात्री डान्सचा सराव करायचो. मला अनेक जण नावं ठेवत होते. पण, मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. आई-वडिलांनी भक्कम पाठिंबा दिला. ‘डान्स प्लस’च्या तीन सीजनपर्यंत ऑडिशन दिल्या. पण, यश आले नाही. चौथ्या शोसाठी पुण्यात ऑडिशन दिली. पण, निवड झाली नाही. त्यामुळे मी दुसऱ्याच दिवशी थेट मुंबई गाठली अन्‌ माझ्या कष्टाला यश आले. पुनित पाठक यांच्या टीममध्ये माझा समावेश झाला. आकाश शेट्टी यांनी परफॉर्मन्स शिकविला. दिवसभरात मी फक्त दोन-तीन तासच झोपत असे. उर्वरित वेळेत सराव करत होतो. अखेर त्याला यश आले अन्‌ या रिॲलिटी शोमध्ये विजेता झालो.’’

कुणाच्या आशेवर राहू नका
हिंदीतील डान्स रिॲलिटी शोमध्ये प्रथमच मराठमोळ्या चेतनला यश आले आहे. त्याला २५ लाखांचे बक्षीस मिळाले. तो म्हणाला, ‘‘आई-वडिलांनी माझ्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत. आता मी घर बांधणार असून, दोन बहिणींची लग्नेही करणार आहे. रस्ता सापडत नसतो. तो शोधावा लागतो. मागे ओढणारे खूप असतात; पण, पुढे पाठविणारे एक-दोन जणच. त्यामुळे कुणाच्या आशेवर राहू नका. स्वतः मेहनत करा. नक्कीच यश येईल.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

SCROLL FOR NEXT