श्रावणात दासबोध विचार, श्रीकृष्ण लीलांचा जागर
शनिवार (ता.१३) पासून अल्ली महाराजांची व्हीडीओद्वारे पारायण व प्रवचने
.........
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ११ : श्रावणमासाच्या निमित्ताने आध्यात्मिक वातावरणनिर्मितीसाठी श्री स.स. नागनाथ अल्ली महाराज यांच्या ‘श्रीमद् दासबोध पारायण’ तसेच ‘श्रीकृष्ण लीला’ या विषयावरील व्हिडीओद्वारे प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार (१३ ऑगस्ट) ते शुक्रवार (४ सप्टेंबर) या कालावधीत श्रीनिवास पिस्के वाडा, साईबाबा चौक येथे हा भक्तिमय उपक्रम होणार आहे.
श्रावण महिन्यातील धार्मिक परंपरा आणि आध्यात्मिक चिंतनाला उजाळा देणाऱ्या या उपक्रमात दररोज सकाळी ७ ते ८.३० या वेळेत श्रीमद् दासबोध पारायण होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७ ते ८.३० या वेळेत श्री स.स. नागनाथ अल्ली महाराज यांचे ‘श्रीकृष्ण लीला’ या विषयावरील व्हिडीओद्वारे प्रवचन होणार आहे. श्रीमद् दासबोधातील विचारांचे श्रवण, मनन आणि चिंतनातून साधकांना आध्यात्मिक मार्गदर्शन मिळावे, तसेच श्रीकृष्णांच्या विविध लीलांमधून भक्ती, प्रेम आणि जीवनमूल्यांचा संदेश समजावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. श्रावणातील पवित्र वातावरणात पारायण आणि प्रवचनाच्या माध्यमातून भाविकांना आध्यात्मिक अनुभूती घेता येणार आहे.
.....
चौकट
कालावधी
१३ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६
- श्रीमद् दासबोध पारायण : सकाळी ७ ते ८.३०
- ‘श्रीकृष्ण लीला’ प्रवचन : सायंकाळी ७ ते ८.३०
- स्थळ : श्रीनिवास पिस्के वाडा, पंचमुखी मारुती मंदिरनजीक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.