vaishali jadhav and draupada jadhav
vaishali jadhav and draupada jadhav sakal
पुणे

Motivation News : दौंडमध्ये सुनेसाठी सासू ठरली देवदूत

रमेश वत्रे

केडगाव - 'आमचे २१ जणांचे एकत्र कुटुंब. मुलगा पांडुला दोन लहान मुलं. सूनेच्या दोन्ही किडण्या खराब. सून घरात रडायची. नातवंडे पण रडायची. हे बघवाना. नातवंडांच्या तोंडाकडे पाहून सुनेला हसत हसत किडणी दिली. आता आम्ही दोघी ठणठणीत आहोत. आज नातवडं, सून, मुलगा सगळी खूष आहोत. नशीबाने कोरोनातून जगलो वाचलो. भरल्या घरात आणखी काय पाहिजे. माझे काय आज आहे तर उद्या नाही.' हे बोल आहेत आदर्श सासू द्रोपदा खंडू जाधव यांचे.

सासू सुनांचा वितुष्ठपणा अनेकदा आपण ऐकतो. चित्रपटात पाहतो. बातम्यांमधून वाचत असतो. पण गिरीम (ता. दौंड) येथील वरील घटना पाहता ती विलक्षण वाटते. ऐकणारा चाट होतो. सून वैशाली पांडुरंग जाधव (वय-३८) यांना वर्षापुर्वी हातापायांना सूज येऊन दम लागत होता. रक्त कमी झाले होते. तपासण्या केल्या तर किडण्यांची समस्या समोर आली.

दौंड येथील कार्यकर्ते नंदू पवार यांनी वैशाली जाधव व किडणी तज्ज्ञ डॅा. सुर्यभान भालेराव यांची भेट घालून दिली. तपासणीनंतर डॅाक्टरांनी किडण्या बदलण्याचा सल्ला दिला. जाधव कुटुंबियांच्या पायाखालची वाळू सरकली. आठवड्यातून दोनदा डायलिसीस करावे लागत होते. किडणीसाठी शोधाशोध सुरू झाली.

आई, वडील, चुलते हे किडणी द्यायला पुढे आले परंतू त्यांचा फिटनेस ठिक नव्हता. घरात पुन्हा रडारड सुरू झाली. भरल्या घरात कुणाला अन्न गोड लागेना. मग पांडुरंग किडणी द्यायला तयार झाला. परंतू आई द्रोपदाने त्यास नकार देत स्वतःची किडणी देण्याचा निर्णय घेतला. सून वैशालीचे नशीब बलवत्तर की ६८ वयातही द्रोपदाबाईंचा फिटनेस उत्तम आला.

वैद्यकीय तपासणीत सर्व आवश्यक बाबी मॅच झाल्या. आमदार राहुल कुल, नंदू पवार यांची मदत झाली. मार्च २०२३ मध्ये डॅा. भालेराव यांनी यशस्वीरित्या किडणी प्रत्यारोपण केले. सासूने सुनेला किडणी देणे हे आमच्या रूग्णालयातील पहिलेच उदाहरण असल्याचे डॅाक्टरांनी नमूद केले आहे.

द्रोपदाबाई यांनी पुर्वी शेतात खूप कष्ट केले आहे. त्यांना कोणताही आजार नाही तरीही त्या रोज चालणे व हलका व्यायाम करतात. त्यांचे पती खंडू जाधव यांनी कुटुंब एकत्र ठेवले. त्यांच्या निधनानंतरही द्रोपदाबाईंनी एकत्र कुटुंब टिकवले आहे.

माझ्यासाठी त्या देवदूत....

सासूचे गुण गाताना वैशाली जाधव यांचे डोळे भरून आले. सुनेकडे पाहत द्रोपदाबाईंनी डोळ्याला पदर लावला. वैशाली म्हणाल्या, 'सासू द्रोपदांबाईंनी मला पुनर्जन्म दिला. माझ्या लहान लेकरांना आई दिली. माझ्या नव-याला बायको दिली. त्यांचे उपकार मी आयुष्यभर विसरू शकत नाही. मी भाग्यवान आहे मला अशी सासू मिळाली. त्या माझ्यासाठी देवदूत आहेत.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

IPL 2024 RR vs KKR Live Score: तब्बल तीन तासांच्या विलंबानंतर राजस्थान-कोलकाता संघात 7-7 ओव्हरचा सामना; श्रेयस अय्यरने जिंकला टॉस

SCROLL FOR NEXT