daund bhima river
daund bhima river 
पुणे

दौंड पालिकेचे डोके ठिकाणावर आहे का? कचरा थेट भीमा नदीत 

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : दौंड नगरपालिकेकडून संकलित केला जाणारा कचरा थेट भीमा नदी पात्रात टाकण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. 

दौंड शहरातील 45 कचरा कुंड्यांमधील कचरा कॉम्पॅक्‍टरच्या साह्याने संकलित करण्यासह बारा घंटागाड्यांच्या साह्याने घरोघरी जाऊन एकूण आठ टन सुका कचरा गोळा केला जातो. मात्र, तो भीमा नदी काठावरील स्मशानभूमी परिसरातील मंत्री छत्रीजवळील बेकायदा वीट भट्ट्यांचा विस्तार करण्यासाठी टाकण्यात आला. नदी काठावरील खडकांमधील खड्डे कचऱ्याने भरून ती जागा समतल केली. त्यानंतर नगरपालिकेच्या कंत्राटदाराकडून नगरपालिकेच्या जेसीबी यंत्राच्या साह्याने कचरा थेट नदी पात्रात टाकण्यात आला आहे.

याबाबत नॅशनल दलित संघटनेचे तालुका सचिव पांडुरंग गडेकर यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

दौंड शहरातून दररोज 10 टन ओला व 8 टन सुका कचरा संकलित केला जात असून, ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प सध्या बंद आहे. घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी मागील पंधरा महिन्यांपासून जागेचा शोध सुरू आहे. मागील दोन महिने सुका कचरा नगरपालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या आवारात टाकण्यात आला आहे. परंतु, आवार तुडुंब भरल्याने नदी काठावर कचरा टाकला जात आहे. 

भीमा नदी काठावरील बहुतांश वीटभट्ट्या या तहसीलदारांच्या नावावरील महसूल खात्याच्या जागेत अतिक्रमण करून सुरू आहेत. त्यांनी नदीकाठचा पट्टा गिळंकृत केला आहे. मात्र, या बेकायदा भट्ट्यांचा विस्तार करण्यासाठी नगरपालिकाच कचरा पुरवत आहे. 

चौकशी करणार : आरोग्य निरीक्षक 
याबाबत नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक शाहू पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, ""वीटभट्टीवाल्यांनी खड्डे भरण्यासाठी कचरा घेतला होता. कचरा नदी पात्रात टाकण्यासाठी ठेकेदाराला कोणत्याही प्रकारची तोंडी वा लेखी सूचना दिलेल्या नाहीत. नदी पात्रात कचरा टाकला असल्यास चौकशी करून कारवाई केली जाईल.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: भाजपचे उमेदवार पराभूत होणार हे लक्षात आल्याने भाजप सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय घेतला आहे- राजू शेट्टी

Shiv Sangram: 'शिवसंग्राम' विधानसभेच्या 12 जागा लढवणार, लोकसभेची रणनीती काय? ज्योती मेटेंनी स्पष्ट केली भूमिका

IPL 2024 DC vs MI Live Score : अखेर मुंबईला मिळालं पहिलं यश; आक्रमक खेळणाऱ्या फ्रेझर-मॅकगर्कचं शतक हुकलं

Gurucharan Singh: गुरुचरण सिंह बेपत्ता प्रकरणात मोठी अपडेट; सीसीटीव्ही फुटेज लागलं पोलिसांच्या हाती

SCROLL FOR NEXT