bulls
bulls sakal
पुणे

Daund News : दौंड पोलिसांनी केली २१ रेड्यांची सुटका

प्रफुल्ल भंडारी

दौंड - कत्तल करण्याच्या उद्देशाने एका टेम्पोत दाटीवाटीने बांधण्यात आलेले तब्बल एकवीस रेड्यांची सुटका करण्यात दौंड पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पाच लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील दौंड पोलिसांनी या बाबत माहिती दिली. दौंड रेल्वे उड्डाणपुलावरून पाटसच्या दिशेने एक टेम्पो (एम. एच. ०३, डी. व्ही. ३३८०) जात असताना दौंड पोलिसांच्या पथकाने कागदपत्रांच्या चौकशीसाठी थांबविला होता. टेम्पोच्या आतील मालाबद्दल विचारणा करताच चालकाने विसंगत उत्तर दिले. पोलिसांनी पाहणी केली असता टेम्पोत अत्यंत दाटीवाटीने एकूण २१ रेडे कोंबून बांधण्यात आल्याचे आढळून आले.

कोल्हापूर जिल्ह्यातून दौंड - पाटस मार्गे हे रेडे कल्याणच्या दिशेने नेले जात असल्याची माहिती टेम्पोचालकाने पोलिसांना दिली. या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्याचे कॅान्स्टेबल अक्षय घोडके यांच्या फिर्यादीनुसार टेम्पोचालक मुस्तफा मोहमंद शफिक शहा (वय ३५ , रा. पालापुर, उत्तरौला, उत्तर प्रदेश) व त्याचा सहकारी अब्दुल इब्राहीम कुरेशी ( वय ५२, रा. माढा, जि. सोलापूर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौंड पोलिसांनी या २१ रेड्यांची रवानगी एका गोशाळेत केली असून टेम्पोसह एकूण ५ लाख ६५ हजार ७०० रूपयांचा मुद्गेमाल जप्त केला आहे, अशी माहिती अंमलदार अमिर शेख यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT