road accident
road accident sakalmedia
पुणे

Road accident : उसाच्या ट्रॅालीला धडकून तीन तरूणांचा मृत्यू

प्रफुल्ल भंडारी

दौंड : दौंड - पाटस अष्टविनायक मार्गावर रिफ्लेक्टर नसलेल्या उसाच्या ट्रॅक्टर - ट्रॅालीला धडकून झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन तरूण जागीच ठार झाले आहेत. मृत तरूण नगर जिल्ह्यातील काष्टी येथील रहिवासी होते.

दौंड - पाटस अष्टविनायक मार्गावर मांढरे मळ्याच्या अलीकाडे १३ नोव्हेंबर रोजी रात्री हा भीषण अपघात झाला. ऋषीकेश महादेव मोरे (वय २६), स्वप्निल सतिश मनुचार्य (वय २४) व गणेश बापु शिंदे (वय २६, तिघे रा. काष्टी बाजारतळ परिसर, काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. नगर) अशी मृतांची नावे आहेत. ऋषीकेश मोरे व त्याचे दोन मित्र एका दुचाकीवर (एम. एच. १६, बी. पी. ९२८०) वरून जेवणासाठी रात्री दौंड - पाटस रस्त्यावर आले होते. जेवणानंतर दौंडच्या दिशेने येत असताना क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरलेल्या ट्रॅक्टर - ट्रॅालीने अचानक वेग कमी केल्याने दुचाकीस्वार ट्रॅालीला पाठीमागून जोरात धडकले. ट्र्रॅक्टर - ट्र्रॅालीला परावर्तक (रिफ्लेक्टर) नसल्याने दुचाकीचालकाला मार्गावरील ट्रॅक्टर - ट्रॅालीचा अंदाज न आल्याने ही धडक झाली.

अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ व दौंड पोलिसांनी तिन्ही तरूणांना उपचारासाठी रूग्णालयात नेले परंतु त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला होता. दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी मृत ऋषीकेश मोरे या तरूणाचे वडील महादेव गुलाब मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रॅक्टरचालक विशाल निवृत्ती दिवेकर (रा. वरवंड, ता. दौंड) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर ट्रॅक्टरचालकाने पोलिसांना खबर न देता निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT