मेल्झर केमिकल चोरीप्रकरणी दहा आरोपींना अटक
मेल्झर केमिकल चोरीप्रकरणी दहा आरोपींना अटक सकाळ
पुणे

दौंड : मेल्झर केमिकल चोरीप्रकरणी दहा आरोपींना अटक

सावता नवले

कुरकुंभ : दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील मेल्झर केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील 48 लाख 50 हजार 914 रूपये किंमतीच्या केमिकल चोरीप्रकरणी पोलिसांनी आणखी दहा आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 13 लाख 62 हजार 729 रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील मेल्झर कंपनीत 5 मार्च 2022 रोजी चोरटयांनी नायट्रो मिथेन केमिकलचे प्रत्येकी 250 किलो वजनाचे 56 ड्रम चोरीला गेल्यासंदर्भात दौंड पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. चोरीला गेलेल्या केमिकलची किंमत 48 लाख 50 हजार 914 रूपये होती. पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी सदर गुन्हाचा तपास करण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करून ठिकठिकाणी पाठवली. या पथकाने केमिकल चोरीप्रकरणी पोलिसांनी यापूर्वी दोन व आणखी दहा आरोपींना अटक केली.

अटक केलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे वाहनचालक शंकर दिनकर झरेकर ( वय 40, रा. नानवीज, ता. दौंड ), बिरप्पा मारूती लवटे ( वय 38, रा. गोपाळवाडी, ता.दौंड ), ढब्बू भगेला कहार ( वय 28, रा. उत्तर प्रदेश ), केशव दत्तू रसाळ ( वय 43, रा. पाटस, ता.दौंड ), विशाल दशरथ शितोळे ( वय 40, रा. खडकी, ता. दौंड ), सचिन संजय गिरमे ( वय 30, रा. कुरकुंभ, ता. दौंड ), सागर मच्छिंद्र बारवकर ( वय 30, रा. देऊळगावगाडा, ता. दौंड ), महेश तात्यासाहेब गायकवाड ( वय 35, रा. कुरकुंभ, ता. दौंड ), ब्रिजेश रामलवटण यादव ( वय 40 ), संजय टिटलू यादव ( वय 43 , दोघे रा. भिवंडी मुंबई ) या दहा जणांना अटक केली.

या आरोपींना न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने त्यांना 4 एप्रिल 2022 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यापूर्वी अटक केलेले दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. कंपनीतून केमिकल चोरीसाठी आरोपींनी दोन वाहने वापरली. तर हे केमिकल विक्रीसाठी नेण्यासाठी तीन वाहने असा एकूण पाच वाहनांचा वापर गुन्हयात करण्यात आला आहे. यातील विशाल शितोळे हा आरोपी तेजस लाॅजिस्टीक ट्रान्सपोर्टचा मालक आहे. तर केशव रसाळ या ट्रान्सपोर्टचा व्यवस्थापक आहे. तर भिवंडी मुंबई येथील ब्रिजेश यादव व संजय यादव हे चोरीचे केमिकल विकत घेणारे व्यापारी आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT