पुणे

कुटुंबीयांनीही ओळखला नाही मृतदेह...

सकाळ वृत्तसेवा

शिक्रापूर (पुणे) : करंदी (ता. शिरूर) येथून सहा महिन्यांपूर्वी राहत्या घरातून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा मृतदेह शिक्रापूर पोलिसांना आज गावाजवळील एका जंगलात सापडला. मृताच्या खिशातील आधारकार्डासह इतर दस्तावेजांमुळे सदर व्यक्ती बाळासाहेब ढोकले असल्याचे निष्पन्न होऊनही कुटुंबीयांनी मृतदेह ढोकले यांचा नसल्याचा दावा केल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. मात्र, कपडे व इतर वस्तूंमुळे मृतदेहाची ओळख पटल्याने पोलिसांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.

करंदी येथील बाळासाहेब ज्ञानोबा ढोकले (वय 58) हे सहा महिन्यांपूर्वी राहत्या घरातून गायब झाले. याबाबत कुठे तरी बाहेरगावी गेले असतील व परत येतील म्हणून पत्नी, दोन मुले व सुना यांनी ढोकले यांच्या गायब होण्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, मंगळवारी (ता. 12) सकाळी साडेआठच्या सुमारास गावातीलच महेश कोंडिबा साबळे (रा. करंदी) यांना गावाजवळील पिंपळदरा जंगलात मानवी कवटी, हाडे आणि कपडे अस्ताव्यस्त पडलेल्याचे दिसले. त्यांनी शिक्रापूर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी पोलिस पथकासह पाहणी केली असता विषारी औषधाची बाटली, काही कपडे, कपड्यांमध्ये मृत ढोकले यांचे आधारकार्ड व काही कागदपत्रे सापडली. त्यावरून ढोकले परिवाराला बोलावून घेतले. मात्र, मृतदेहाची ओळख पटावे असे काहीच दिसत नसल्याने ढोकले परिवाराने हा मृतदेह बाळासाहेब ढोकले यांचा नसल्याचे सांगितल्याने पोलिसही चक्रावले. काही वेळाने सोबतची कागदपत्रे, गायब होण्याचा कालावधी, अस्ताव्यस्त पडलेल्या इतर वस्तूंची पाहणी केली असता सदर मृतदेह बाळासाहेब ढोकले यांचा असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती पोलिस नाईक ब्रह्मा पवार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT