Property Tax  Sakal
पुणे

Property Tax : मिळकतकर सवलतीसाठी आज शेवटचा दिवस

ही योजना पुणेकरांमध्ये लोकप्रिय असल्याने दरवर्षी भरपूर प्रतिसाद मिळतो.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मिळकतकरात पाच ते १० टक्क्यांच्या सवलतीसाठी प्रशासनाने दिलेली मुदत उद्या (ता. १५) संपणार आहे. १ एप्रिल ते १४ जून पर्यंत महापालिकेच्या तिजोरीत ६ लाख ७५ हजार मिळकतधारकांनी १२७९.७७ कोटी रुपये जमा केले आहे. ज्या नागरिकांनी मिळकतकर भरला नाही, त्यांनी कर भरावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला मिळकतकरातून जास्त पैसे मिळावेत, यासाठी १ एप्रिल ते ३१ मे या दोन महिन्यांच्या कालावधीत २५ हजारांपर्यंत १० टक्के व २५ हजारांच्या पुढे पाच टक्के सवलत दिली जाते. ही योजना पुणेकरांमध्ये लोकप्रिय असल्याने दरवर्षी भरपूर प्रतिसाद मिळतो. यंदा अनेकांना मिळकतकराची बिलेच न मिळाल्याने मुदतवाढ देण्यात आली होती.

महापालिकेकडे एकूण १४.२२ लाख मिळकतींची नोंद असून, त्यापैकी ६ लाख ७५ हजार १९३ निवासी मिळकतधारकांनी १२७९.७७ कोटी रुपये जमा केले आहेत. शनिवारी पैसे भरण्यासाठी सवलतीचा शेवटचा दिसून असून, ज्या नागरिकांनी कर भरला नाही त्यांनी पैसे भरावेत, असे आवाहन कर संकलन विभागाचे प्रमुख, उपायुक्त माधव जगताप यांनी केले आहे.

१४ दिवसांत ३०६ कोटी

मिळकतकराची सवलत ३१ मे रोजी संपणार होती. तेव्हा ५ लाख ६५ हजार मिळकतधारकांनी ९७३ कोटींचा कर महापालिकेकडे जमा केला आहे. आता १५ दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतर या मुदतीत आणखी ३०० कोटी रुपये जमा होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. त्यानुसार १ जून ते १४ जून या कालावधीत १ लाख १० हजार १९३ जणांनी ३०६ कोटीचा कर जमा झाला आहे. शेवटच्या दिवसात यात आणखी भर पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: सत्तारांचे पंख छाटण्यासाठी भाजपचा पहिला वार!;अब्दुल समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज बाद, स्वप्न भंगले; शिवसेनेच्या आमदार जाधव, अण्णासाहेब माने यांनाही धक्का

Latest Marathi News Live Update : जागतिक बाजार घसरले असताना भारतीय शेअर बाजारात तेजी

Beed: दलदल, चिखलातून काढावा लागतोय मार्ग ;रस्ते चिखलात; पुरुषोत्तमपुरीत प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा भाविकांना फटका

Sangli Satara Election: स्वाभिमान दाखविल्यास निकाल बदलेल: जयंत पाटील, शशिकांत शिंदे; नाराजांची मदत घेणार, दोन्ही राजांनी स्वाभिमान दाखवावा

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचा केंद्र सरकारसह अदाणींना मोठा दणका; २० हजार कोटींच्या स्मार्ट मीटर प्रकल्प केला बंद

SCROLL FOR NEXT