Death threat to chhagan Bhujbal man arrested in pune call recording of death threat call to bhujbal viral  
पुणे

Threat Call to Bhujbal : 'मी उद्या भुजबळांना मारणार…' कॉल रेकॉर्डिंग आलं समोर; आरोपीला पुण्यातून अटक

रोहित कणसे

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या बंडानंतर घडामोडींना वेग आला आहे. यादरम्यान अजित पवारांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतलेले नेते छगन भुजबळ यांनी फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील एका तरुणाला पुणे पोलिसांनी महाड (जि. रायगड) येथून अटक केली आहे. आता या धमकीच्या फोन काँलचे रेकॉर्डिंग देखील आता समोर आले आहे.

छगन भुजबळ पुण्यात दौऱ्यावर असताना हा धमकीचा फोन आल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि कोरेगाव पार्क पोलिसांनी तातडीने हालचाली करत मोबाईल क्रमांकाच्या लोकेशनवरून त्या तरुणाला महाड येथून ताब्यात घेतले. संबंधित तरुणाने मद्यधुंद अवस्थेत धमकीचा फोन केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे आणि सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा आणि कोरेगाव पार्क पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.

ऑडिओ क्लिप मध्ये काय आहे..

भुजबळांच्या ऑफिसमध्ये फोन लागला आहे का फोन असं आरोपीनं विचारलं. त्यानंतर, भुजबळांना मारायची सुपारी मिळालीय. मी प्रशांत पाटील बोलतोय. मला त्यांना मारायची सुपारी मिळालीय, त्यांना उद्या मी मारणार आपण सांगून काम करतो म्हणून तुम्हाला सांगतोय. सुपारी कोणी दिली असं विचारलं असता, दिली अशीच कोणीतरी असंही त्याने सांगितलं.

साहेबांनी काय वाईट केलंय तुमचं? त्यांना का मारणार असं विचारलं असता, काय वाईट केलंय ते साहेबांना माहिती असं उत्तर आरोपीनं दिलं. मी सांगून काम करतो म्हणून सांगायचं काम केलं. ठेवा आता, म्हणत त्याने फोन ठेवून दिला. आता पुणे पोलिसांनी प्रशांत याला अटक केली असून अधिकचा तपास सुरू केला आहे.

हा तरुण मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील असून सोमवारी रात्री त्याने हा कॉल केला होता. त्यानंतर कोरेगाव पार्क पोलिस आणि गुन्हे शाखा यांनी संयुक्त कारवाई करत त्याला महाड येथून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.

- स्मार्तना पाटील, पोलिस उपायुक्त, परिमंडळ २.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E20 टाकल्याने वाहनाच्या कोणत्या गाड्यांचे होईल नुकसान? 'हे' पार्ट होणार खराब; सरकारने दिली महत्त्वाची माहिती

'लंकापती'चा रौद्र अवतार; तर रणबीर कपूरचा 'राम' पाहून चाहते भारावले! परंतु हनुमान सनी देओलच दिसला नाही, 'रामायण'चा ट्रेलर पाहिलात का?

Almatti Dam Controversy : आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावरून गिरीष महाजनांचा कर्नाटकला थेट इशारा; सांगली-कोल्हापूरच्या महापुराबाबत मोठं विधान

Latest Marathi News Live Update : अमरावती मार्गावर भीषण अपघात, एसटी बसची ट्रकला जोरात धडक, एकाचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी

Telegram Founder: ‘टेलिग्राम’चा संस्थापक गुन्हेगारांच्या यादीत; दहशतवादाला मदत केल्याचा रशियाकडून ठपका

SCROLL FOR NEXT