drown.jpg
drown.jpg 
पुणे

पोहण्यासाठी जलतरण तलावात गेला अन् जीव गमावून बसला

सकाळवृत्तसेवा

पुणे : जलतरण तलावामध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी एक वाजता खराडी येथे घडली. याप्रकरणी जलतरण चालक, जीवरक्षकासह तिघांविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

प्रतिक रमेश बनसोडे (वय 26, रा. इंद्रायणी कॉलनी, तळेगाव स्टेशन, मावळ) असे पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रतिकडे वडील रमेश बनसोडे यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक हा त्याचा मित्र सागर राजेश मेहता (रा. चंदननगर) याच्याकडे आला होता. सागरसमवेत प्रतिक रविवारी दुपारी बारा वाजता खराडी येथील काव्या जलतरण तलावामध्ये पोहण्यासाठी गेला होता. प्रतिकला पोहण्यास येत नव्हते. तरीही त्यास पाण्यात पोहण्यासाठी सांगण्यात आले. दरम्यान, जलतरण तलावातील खोल भागात गेल्यामुळे प्रतिक पाण्यात बुडाला. प्रतिक पाण्यात बुडत असताना जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करत होता. तरीही जलतरण चालक, जीवरक्षक यांनी त्याकडे लक्ष्य दिले नाही. त्यामुळे पाण्यात बुडून प्रतिकचा मृत्यू झाला. जलतरण तलाव चालविणाऱ्यांनी पाण्यात बुडण्यापासून वाचण्यासाठीची फ्लोटर सारखी कोणतीही यंत्रसामुग्री तेथे ठेवलेले नाही. तसेच जीवरक्षकांनीही निष्काळजीपणा करत प्रतिककडे दुर्लक्ष केले. त्यामुळे जलतरण चालक, जीवरसक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT