school sakal
पुणे

राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलची दशकपूर्ती

ज्युनिअर केजी ते दहावीपर्यंत असणाऱ्या या शाळेत ‘स्पेस’ संस्थेच्या मदतीने अकरावी आणि बारावीचे सायन्स कॉलेजचे वर्ग सुरू

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिवदर्शन भागात शाळेसाठी असणाऱ्या‍ आरक्षणावर अतिक्रमण होऊ न देता महापालिकेच्या माध्यमातून भव्य पाचमजली राजीव गांधी अ‍ॅकॅडमी ऑफ ई-लर्निंग एक लाख चौरस फुटाची इमारत आबा बागूल यांच्या प्रयत्नातून उभी राहिली आणि २०११ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तत्कालीन महापालिका आयुक्त महेश पाठक यांच्या उपस्थितीत याचे उद्‌घाटन झाले. आता राजीव गांधी अ‍ॅकॅडमी ऑफ ई-लर्निंगची आज देदीप्यमान दशकपूर्ती संपन्न होत आहे. देशात संगणक व दूरसंचार क्रांती करणाऱ्या‍ पंतप्रधान राजीव गांधींची स्मृती जागती ठेवण्यासाठी या शाळेस राजीव गांधी अ‍ॅकॅडमी ऑफ ई-लर्निंग हे नाव आवर्जून दिले गेले. तसेच राजीव गांधींचा अर्धपुतळा शाळेत उभारला.

तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना या प्रकल्पाची माहिती नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी जाऊन आबा बागूल यांनी दिली, तेव्हा डॉ. मनमोहनसिंग यांनी या प्रकल्पाचे कौतुक केले. गरीब विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंग स्कूलचा प्रकल्प मार्गी लागण्याआधीच आबा बागूल यांच्या पुढाकाराने शिक्षणाची पंढरी असणाऱ्या‍ पुण्यात अशी ई-लर्निंग शाळा सुरूही झाली, ही विशेष बाब मानावी लागेल.

शाळेची वैशिष्ट्ये.....

  • ज्युनिअर केजी ते दहावीपर्यंत असणाऱ्या या शाळेत ‘स्पेस’ संस्थेच्या मदतीने अकरावी आणि बारावीचे सायन्स कॉलेजचे वर्ग सुरू

  • शाळेचा शंभर टक्के निकाल

  • झोपडपट्टी व अन्य गरजू मुले-मुली मोफत शिक्षण घेत असतानाच त्यांना सकाळी पौष्टिक आहार.

  • वह्या-पुस्तकांचे ओझे उतरले.

"पुण्यात शिक्षणाची परंपरा नसणारी गरीब कुटुंबे त्यांच्या पाल्यांना उच्च इंग्रजी शिक्षण देऊ शकत नव्हते. या गरीब कुटुंबातील मुलांना महापालिकेच्या शाळांमध्ये जाणे एवढाच पर्याय उपलब्ध राहिला. हे लक्षात घेऊन पुणे महापालिकेत सत्तेत असणाऱ्या काँग्रेस पक्षाने महापालिका शाळांमधून संगणक शिक्षण चालू केले आणि त्याचवेळी गरीब मुलांसाठी ई-लर्निंग स्कूल सुरू करण्याचा संकल्प पुणे मनपा काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागूल यांनी केला." - अमित बागूल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

Latest Marathi News Live Update : हवामान खात्याकडून रायगडला अवकाळी पावसाचा इशारा

तिथे जाऊन संसार... विदेशात सेटल व्हायला का तयार नाहीये उमेश कामत? प्रियाला म्हणाला- तुला जायचं असेल तर जा पण...

IPL सुरू असतानाच दक्षिण आफ्रिकेच्या स्टार खेळाडूची अचानक निवृत्तीची घोषणा, वार्षिक करारातून वगळ्यानंतर घेतला निर्णय; म्हणाला...

SCROLL FOR NEXT