पुणे

''डेक्कन ओडिसी''तून ३६ विदेशी पर्यटक शहरात दाखल!

CD

‘डेक्कन ओडिसी’ ने वेधले लक्ष
छत्रपती संभाजीनगर येथे दाखल; ३६ परकी पर्यटकांचे पारंपरिकरीत्या स्वागत
छत्रपती संभाजीनगर, ता. १३ : जगभरातील पर्यटकांना महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीची आणि ऐतिहासिक वारशाची सफर घडवणारी आलिशान ''डेक्कन ओडिसी'' ट्रेन शुक्रवारी दुपारी छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकावर दाखल झाली. ऑस्ट्रेलिया, पोलंड आणि ब्रिटन येथील ३६ परकी पर्यटक या विशेष रेल्वेमधून शहरात दाखल झाले.
डेक्कन ओडिसी स्थानकावर पोचताच पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि पुष्पहार घालून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी दिलीप खंडेराया आणि त्यांच्या ग्रुपने पारंपरिक व महाराष्ट्रीयन गीतांचे बहारदार सादरीकरण केले. भारतीय संस्कृतीचे हे अनोखे रूप आणि आदरातिथ्य पाहून विदेशी पाहुणे भारावून गेले. अनेकांनी या स्वागत सोहळ्याचे क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपले, तर काहींनी संगीताच्या तालावर ठेकाही धरला.
रेल्वे स्थानकावरील स्वागतानंतर दुपारी हे पर्यटक देवगिरी किल्ल्याकडे रवाना झाले. किल्ल्याची अभेद्य तटबंदी आणि स्थापत्यकला पाहून पर्यटकांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यानंतर पर्यटकांनी वेरूळ लेण्यांना भेट दिली. कैलास लेण्यासह इतर लेण्यांमधील अद्वितीय कोरीवकाम पाहून पर्यटक भारावले. संपूर्ण सफरीदरम्यान विवेक पाठक, संजय वासवानी आणि विकास मिटकर यांनी पर्यटकांना या ऐतिहासिक वास्तूचा इतिहास, महत्त्व आणि स्थापत्यकलेविषयी सविस्तर माहिती दिली.
‘डेक्कन ओडिसी’ ट्रेन
‘डेक्कन ओडिसी’ ही भारतीय रेल्वे आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्‍यातर्फे सुरू करण्यात आलेली एक आलिशान पर्यटन रेल्वेगाडी आहे. यामध्ये पंचतारांकित हॉटेलप्रमाणे सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. ही ट्रेन प्रामुख्याने मुंबईतून सुटते आणि छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, गोवा, सिंधुदुर्ग तसेच गुजरात आणि राजस्थानमधील निवडक ऐतिहासिक व सांस्कृतिक पर्यटनस्थळांची सफर घडवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: शेवटच्या वनडेत खेळणार नाही मॅट हेन्री, विराट कोहलीने जर्सी भेटही दिली; पण कारण काय?

आयुष्मान कार्डधारकांना धक्का! आता ११२ आजारांवरील उपचार खासगी रुग्णालयांत होणार नाहीत, मोदी सरकारचा प्रस्ताव

Maharashtra Tourism: गोव्याच्या गर्दीपासून दूर, कोकणात आहे समुद्राचं हे सुंदर जग! एका बोटसफारीतून पाहता येतात १ नाही तर १२ ठिकाणं

Latest Marathi News Live Update: दूध विक्रीच्या दरामध्ये मोठी वाढ, प्रति लिटर ४ रुपयांनी महागले

NTA Reform: NEET मधील पेपरफुटीनंतर मोठा निर्णय; गैरप्रकार रोखण्यासाठी आता थेट लष्करी अधिकाऱ्यांना...

SCROLL FOR NEXT