exam
exam 
पुणे

'एमटीएस' परीक्षा कोरोना लाॅकडाऊन मुळे स्थगित

सकाळवृत्तसेवा

पुणे - नौरोसजी वाडिया महाविद्यालयाच्या प्रज्ञाशोध आणि सर्वोकृष्टता केंद्रातर्फे आयोजित केली जाणारी 'महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा' (एमटीएस) कोरोना लाॅकडाऊन मुळे स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर पुढील तारीख कळविण्यात येईल, असे परीक्षेचे संयोजक शेखर घाटे यांनी सांगितले. 

इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा घेतली जाते. यंदा ही परीक्षा १८ एप्रिलला होणार होती. यासाठी महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील ७ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. केंद्र सरकारने १५ एप्रिल पर्यंत लाॅकडाऊन जाहीर केलेला असल्याने परीक्षेच्या तयारीचे सर्व कामकाज बंद अाहे. निर्बंध उठल्यानंतर  लगेच परीक्षा घेणे शक्य नाही. 

त्यामुळे 'एमटीएस' परीक्षा स्थगित करण्यात आली आहे.  विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल याची काळजी घेऊन परीक्षेची पुढची तारीख निश्चित  केली जाईल, असे घाटे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईकरांना IMD चा इशारा! पुढील 3 ते 4 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, काळजी घेण्याचा सल्ला

Video: हिंदू-मुस्लीम ज्या दिवशी करेन, त्या दिवशी...; 'जास्त मुलांच्या' वक्तव्यावर PM मोदींनी दिलं स्पष्टीकरण

Gautam Gambhir: हार्दिकच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या डिविलियर्सवर भडकला गंभीर; म्हणाला, 'त्यांच्या कारकि‍र्दीत...'

Modi Road Show: PM मोदींचा उद्या घाटकोपरमध्ये 'रोड शो'; वाहतुकीत 'असे' असतील बदल

IPL 2024 DC vs LSG Live Score: लखनौ - दिल्लीमध्ये अटीतटीचा सामना, प्लेऑफ शर्यतीत कायम राहण्याचे दोन्ही संघांसमोर आव्हान

SCROLL FOR NEXT