Coronavirus
Coronavirus Sakal
पुणे

ग्रामीण भागातील निर्बंध शिथिलतेबाबत आज निर्णय

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे शहर (Pune City) व पिंपरी चिंचवडपाठोपाठ (Pimpri Chinchwad) आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील (Rural Area) कोरोना बाधितांचा दर (कोरोना पॉझिटिव्हिटी रेट) (Corona Positivity Rate) हा सात टक्क्यांच्या आता आला आहे. यामुळे शहरापाठोपाठ ग्रामीण भागातील निर्बंधही (Restriction) हटविले जाण्याची शक्यता आहे. निर्बंध शिथिलतेबाबतचा निर्णय गृहमंत्री दिलीप वळसे (Dilip Valse) हे उद्या (ता.२५) होणाऱ्या जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीत जाहीर करतील, असे गुरुवारी (ता.२४) जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. (Decision Today on Relaxation of Restrictions in Rural Areas)

शहर व पिंपरी चिंचवडमधील कोरोना बाधितांचा दर हा दोन आठवड्यांपूर्वीच पाच टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे मागील दोन आठवड्यांपासून या दोन्ही शहरातील निर्बंध शिथिल केले आहेत. त्याचवेळी ग्रामीण भागातील हा दर दहा टक्क्यांहून अधिक होता. त्यामुळे येथील निर्बंध अद्याप कायम आहेत. ग्रामीणमधील बाधितांचा दर, आठवडाभरापूर्वी साडेनऊ टक्के, चार दिवसांपूर्वी साडेआठ टक्के झाला होता. तोच आज (ता.२४) सात टक्क्यांवर आला आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याऐवजी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे शुक्रवारी (ता.२५) पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या बैठकीला पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी, दोन्ही शहरांचे महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आगींना निमंत्रित केले आहे.

राज्य सरकारने पूर्वी नियम शिथिल करण्यासाठी बाधितांचा दर किमान दहा टक्के असणे अनिवार्य केले होते. त्यामुळे मागील सलग दोन बैठका होईपर्यंत ग्रामीणमधील हा दर दहा टक्क्यांवर आला नव्हता. आता मात्र तो सात टक्क्यांवर आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT