पुणे

वर्दीतल्या श्वानांना ट्रेन करणाऱ्या डॉग हँडलर दीप्ती आढाव

पांडुरंग सरोदे

पुणे - ‘त्या’ महिला ‘डॉग हॅंडलर’ आहेत, त्याही पुणे पोलिस दलाच्या श्‍वान पथकामध्ये (डॉग स्क्वॉड). येण्याची अनेकांची इच्छा नसते. मात्र, आवडीने त्या पथकात आल्या. ‘वीरू’ नावाच्या श्‍वानाच्या त्या ‘हॅंडलर’ झाल्या. अमली पदार्थांची वर्दी मिळाली, की त्या अन्य सहकाऱ्यांसमवेत तपासणी करतात. घातपाती कृत्ये रोखण्याच्या कारवाईमध्येही त्या सहभागी होतात. पोलिस  शिपाई दीप्ती आढाव असे त्यांचे नाव आहे.

खुनातील आरोपी, दरोडेखोरांचा शोध किंवा बाँबसदृश वस्तूंची तपासणी, अमली पदार्थांची तस्करी रोखण्यात पथकामधील श्‍वान आघाडीवर असतात. सध्या पुणे पोलिस दलाच्या गुन्हे शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या ‘डॉग युनिट’मध्ये आठ ते नऊ श्‍वान आहेत. काही प्राणिप्रेमी पोलिस आवडीने पथकामध्ये काम करतात. या श्‍वान पथकात नोव्हेंबर २०१७ मध्ये दीप्ती आढाव आल्या.

पोलिस दलात वेगवेगळ्या ठिकाणी काम केल्यानंतर त्यांनी श्‍वान पथकात काम सुरू केले. अमली पदार्थविरोधी कारवाईत सहभागी असणाऱ्या ‘वीरू’ या श्‍वानाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. ‘वीरू’चा व्यायाम, सराव, जेवण, आरोग्याकडे बारकाईने लक्ष दिले जाते. आठवड्यातील चार दिवस शहरांतील कारवाईमध्ये सहभाग असतो. गणेशोत्सवामध्ये मॉल, रेल्वे स्थानक, हॉटेल येथील अमली पदार्थांच्या कारवाईमध्ये त्या सहभागी होतात. संशयित  वस्तू आढळल्यास श्‍वानाकडून त्यांना सतर्क केले जाते, त्यानंतर पुढील कारवाई होते. विशेषतः ‘वीरू’ने २०१५ मध्ये अखिल भारतीय पोलिस कर्तव्य मेळाव्यामध्ये ब्राँझपदक पटकाविले आहे. 

श्‍वानाविषयी प्रेम असल्यामुळेच पथकामध्ये आले. सध्या माझ्याकडे ‘वीरू’ची जबाबदारी आहे. तो खेळकर असून, कामाबाबत प्रामाणिक आहे. श्‍वान पथकामध्ये काम करण्यास मिळणे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.
- दीप्ती आढाव, पोलिस शिपाई

आमच्या पथकाकडे नऊ श्‍वान आहेत. त्यांची जबाबदारी १८ ‘डॉग हॅंडलर’कडे आहे. आढाव व त्यांच्या ‘वीरू’ या श्‍वानाकडून चांगली कामगिरी केली जात आहे.
- प्रदीप जाधव, पोलिस उपनिरीक्षक, श्‍वान पथक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

Manifesto : केवळ घोषणा, अंमलबजावणी नाही! जाहीरनाम्यांपासून ज्येष्ठ नागरिक दूरच असल्याची खंत

MPSC Exam : लोकसेवा आयोगाचं शुद्धीपत्रक, राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Vimannagar Fire : विमाननगर येथे व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला आग

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

SCROLL FOR NEXT