delivery boys.jpg
delivery boys.jpg 
पुणे

...म्हणून डिलिव्हरी बॉईज झालेत हतबल

सकाळवृत्तसेवा

आंबेगाव (पुणे) : परत होणाऱ्या लॉकडाउनमधे शहरातील ऑनलाइन फूड डिलिव्हरी बंद राहणार आहे. त्यामुळे डिलिव्हरी बॉईज परत एकदा काही दिवस घरी बसणार आहेत व त्यामुळे त्यांचा काही दिवसांचा रोजगार बुडणार आहे तर पहिलेच ऑर्डर कमी झाल्याने उत्पन्न घटलेल्या डिलिव्हरी बॉईजच्या अडचणीमध्ये यामुळे वाढ होणार आहे.
काही महिने आम्ही घरी बसून होतो. आताशी कुठे कामधाम सुरू झाले होते. मोठा विद्यार्थी वर्गाबाहेर आपापल्या घरी गेल्याने ऑर्डर कमी येत होत्या. त्यामुळे आमचं उत्पन्न ही कमी झाल होत. आम्हाला दर आठवडयाला पगार मिळत असतो. त्यावर आम्ही आमचे खर्च व घराची जबाबदारी चालवत असतो अश्यातच परत होणाऱ्या  लॉकडाउनमुळे आता खर्च कसे चालवायचे असा प्रश्न आमच्या समोर उपस्थित झाला असल्याचे डिलिव्हरी बॉईज सांगत आहेत.

कित्येक डिलिव्हरी बॉईजवर त्यांची संपूर्ण कुटुंब अवलंबून आहेत. त्यामुळे परत एकदा हळूहळू बसत चाललेली आपली छोटीशी आर्थिक घडी पुन्हा विस्कटणार असल्याने हा डिलिव्हरी बॉईज पुरते हतबल झाले आहेत. लॉकडाउनची तयारी म्हणून गेले दोन दिवस झाले. शहराच्या विविध भागात पत्रे, बांबू टाकून रस्ते बंद करण्यात आले आहेत. तरी मोठा वळसा घालून पर्यायी मार्गाने हे डिलिव्हरी बॉईज त्रास सहन करत अन्नाची डिलिव्हरी करत आहेतच. पण पुढील काही दिवस घरी बसून आर्थिक नुकसानीचाही त्रास त्यांना सहन करावा लागणार असल्याचेही ते सांगत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


"जास्त ऑर्डर या विदयार्थ्यांच्या असतात पण सध्या परराज्यातील, परगावातील विद्यार्थी घरी गेल्याने शहरात मोठया प्रमाणावर विद्यार्थीच नाही. त्यामुळे आमच्या ऑर्डर खूपच घटल्या आहेत. तर दुसर नवीन काम आम्हाला मिळत नाहीये अशातच आता परत होणाऱ्या लॉकडाउनमध्ये आमच काम बंद राहणार असल्याने आता काय कराव हा प्रश्न आमच्या समोर निर्माण झाला आहे "

-आशुतोष देठे, डिलिव्हरी बॉय

" दर आठवड्याला आमचा पगार होतो. त्यातच मी खर्च भागवतो पण आता काम काही दिवस बंद राहणार असल्याने काय कराव हा प्रश्न माझ्या पुढे उभा राहिला आहे "

-उत्तम माधापुरतम, डिलिव्हरी बॉय

 

गेली काही वर्ष मी हेच काम करतोय. मधल्या काळात काही महिने बसून काढावे लागले आहेत. एक तर सध्या ऑर्डरही कमी आहेत व त्यामुळे उत्पन्न ही कमी झाले आहे. घरी चार लोक आहेत. त्यातच लॉकडाउनमुळे आता परत काही दिवस घरी बसावे लागणार आहे.

-सुरज चव्हाण, डिलिव्हरी बॉय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT